Dhule; संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे भाजपविरोधात आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानामुळे भाजप नेत्यांसह राज्यपालांविरोधात आंदोलन झाले.
Maratha organiisation agitation
Maratha organiisation agitationSarkarnama

धुळे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, (Bhagatsingh Koshyari) आमदार प्रसाद लाड (Prasad lad) व भाजपच्या (BJP) इतर काही नेत्यांनी वारंवार महाराष्ट्राचे (Maharashtra) अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati shivaji Maharaj) एकेरी उल्लेख केला. ऐतिहासीक संदर्भ नसलेल्या घटनांचा उल्लेख करून अवमान केला. त्याच्या निषेधार्थ समस्त मराठा समाज (Maratha) आणि शिवप्रेमींनी एकत्र येत बुधवारी राज्याचे शिवद्रोही राज्यपाल कोश्यारी व त्यांच्या अनुयायांचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी आमदार, खासदारांच्या निवास्थानावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला. (Maratha community agitation on Chhatrapati Shivaji Maharaj issue)

Maratha organiisation agitation
Swarajya; कर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू!

आंदोलकांनी एका बॅनरवरील सुधांशू त्रिवेदी, देवेंद्र फडणवीस, भगतसिंह कोश्यारी, विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा, श्रीपाद छिंदम यांच्यासह नऊ नेत्यांच्या प्रतिमेस काळे फासून संताप व्यक्त केला. तसेच येत्या १५ डिसेंबरपर्यंत खासदार डॉ. सुभाष भामरे व अन्य आमदारांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांचा निषेध केला नाही, तर त्यांच्या निवासस्थानी कोणत्याही क्षणी मोर्चा काढून निषेध केला जाईल, असा इशारा दिला.

Maratha organiisation agitation
Elections; एकनाथ शिंदे सरकारच्या नव्या प्रभागरचनेबाबत संभ्रम?

माजी आमदार प्रा. पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणीवपूर्वक भाजप, `आरएसएस`ची मंडळी आणि भाजपचे संभाव्य प्रवक्ते, आमदारांनी सातत्याने अवमान केला. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिराव फुले यांचा अवमान केला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे समजले जाणारे भाजपचे प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचे वादग्रस्त विधान केले. या माध्यमातून छत्रपती शिवरायांची प्रतिमा मलिन करण्याचे कटकारस्थान सुरू आहे.

असे असताना भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांची या घटनांचा अद्यापही निषेध व्यक्त केला नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाज व शिवप्रेमींनी आंदोलन केले.

जाहीर माफी मागावी

दरम्यान, आमदार कुणाल पाटील यांनी बुधवारी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य निषेधार्ह आहे. कोणताही शिवप्रेमी ते खपवून घेणार नाही. राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करतो.

राज्यपालपदी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहूनही कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, तर पदावरून त्यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी. भाजप आणि राज्यपाल सातत्याने महापुरुषांचा अवमान करत आहेत. अशा निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधानांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी व भाजपने जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

शहरातील मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन झाले. माजी आमदार प्रा. शरद पाटील, अतुल सोनवणे, डॉ. सुशील महाजन, हेमा हेमाडे, कैलास मराठे, गोविंदा वाघ, राजेंद्र ढवळे, नाना कदम, नैनेश साळुंके, नाना बगदे, संजय बगदे, विकास बाबर, श्रीरंग जाधव, विलास ढवळे, वामन मोहिते, निंबा मोहिते, विजय देवकर, विनोद जगताप, अनिल बगदे, जालिंदर जाधव, वीरेंद्र मोरे, अमर फरताडे आदींसह आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com