पाण्यासाठी महिलांच्या हंडा मोर्चाने दणाणली महापालिका

पंधरा दिवसांनंतर पाणीपुरवठ्यामुळे महिलांचा संताप; नगरसेवक, प्रशासन निष्क्रीय.
Womens morcha at Dhule corporation
Womens morcha at Dhule corporationSarkarnama

धुळे : एकतर पंधरा दिवसांनंतर पाणीपुरवठा, (Water supply in Dhule) तोही अस्वच्छ या कारणावरून देवपूरमधील भगवतीनगरच्या संतप्त महिलांनी (Womens angree) थेट महापालिकेवर (Corporation) हंडा मोर्चा काढला. त्यांनी महापालिकेत आयुक्तांच्या दालनाजवळील परिसर घोषणाबाजीतून दणाणून सोडला. यावेळी नगरसेवक व अधिकारी दालनातच बसून राहिले.

Womens morcha at Dhule corporation
मी पुन्हा आलो, मात्र काही लोकांनी मला माजी केलय!

देवपूरमध्ये नगावबारी परिसरात भगवती नगर आहे. या भागाला समस्यांचा विळखा पडला आहे. भगवती नगरमध्ये गटार नसल्याने सांडपाण्याची समस्या बिकट झाली आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यावरून रहिवाशांचे आपापसांत वाद होत आहेत. अनेकदा निवेदने देऊनही महापालिकेने गटारीचे काम हाती घेतलेले नाही. कॉलनीतील सांडपाणी दोन मंदिराजवळ येते. परिसरात घाणीचे साम्राज्य तयार होते. रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. याबाबत लक्ष वेधूनही नगरसेवक दुर्लक्ष करतात.

Womens morcha at Dhule corporation
देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ईमेलवरील निमंत्रण!

उन्हाळ्यात पंधरा दिवसांनी महापालिका पाणीपुरवठा करते. १५ दिवसांनी जे पाणी मिळते ते गढूळ, अस्वच्छ असते. त्यामुळे आरोग्यदृष्ट्या पिण्याच्या पाण्याचीही भीती वाटते. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते, अशी कैफियत मांडत भगवती नगरमधील महिलांनी आज महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. त्यात प्रिया नागरे, अर्चना कोळी, सुरेखा चौधरी, भाग्यश्री पाटील, संगीता ठाकूर, शोभा ठाकरे, मीना भामरे, सीमा शिरसाट, वंदना शिंदे, शोभाबाई फुलपगारे, अनिता बिलाडे, मुक्ताबाई माळी सहभागी झाल्या.

महापालिकेने केली फसवणूक

विश्‍वकर्मा नगरची समस्येबाबत रहिवाशांनी महापालिकेत आयुक्त दालनाजवळ ठिय्या आंदोलन केले. त्यात विश्‍वकर्मा नगरातील आंदोलक रजनीश निंबाळकर, अशोक तेले, मनोज कोळेकर, गोपाल पाटील, सागर निकम, राहुल चौधरी, अजय मोरे, नरेंद्र चौधरी, मनोज कोळेकर, आशा सोनार, सुलोचना शेलार, सुनीता थोरात, ज्योती कुलकर्णी

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरूनही रहिवाशांचे हाल केले जात असल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाने प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. महापालिकेने गंभीर होऊन नागरिकांचे प्रश्‍न सोडवावे. केवळ आश्‍वासने देऊन बोळवण करू नये, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली. किमान पाणीप्रश्‍नाचे गांभीर्य ओळखून आरोग्याला धोका होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजवावे, अशी मागणीही आंदोलकांकडून झाली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com