....अन माजी खासदार प्रिया दत्त झाल्या भावनावश!

प्रिया दत्त यांच्या हस्ते नर्गीस दत्त विद्यालयाच्या इमारत नूतनीकरण उद्‌घाटन
Congress leader Priya Dutt
Congress leader Priya DuttSarkarnama

नाशिक : शहरातील (Nashik) नर्गीस दत्त (Nargis Dutt) शाळेत झालेल्या नरकार्यक्रमात सहावीतील लहानपणापासून अपंगत्व आलेल्या वैष्णवी सूर्यवंशी या चिमुरडीने नर्गीस दत्त अभिनित ‘मदर इंडिया’ (Mother India Film) चित्रपटातील अजरामर गीत सादर केले. आपल्या आईवरील चित्रित या गाण्याने प्रिया दत्तही (Ex MP Priya Dutt) भावनाविवश झाल्या.

Congress leader Priya Dutt
रावेरला उघड झाला दीड कोटींचा ‘टॉयलेट घोटाळा’

यावेळी प्रिया दय्य यांनी शिक्षण आणि आरोग्य हे देशाच्या भावी पिढीचे दोन मुख्य स्तंभ असून, या क्षेत्रात अधिकाधिक काम करून एक परिपक्व आणि उज्ज्वल भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे सांगितले.

Congress leader Priya Dutt
राज ठाकरेंना भिडणारे दीपक पांडे आता मुंबई शहरात आले!

नर्गीस दत्त फाउंडेशनद्वारे समाजाच्या विविध मूलभूत गरजा आणि रोजगार निर्मितीसाठी नर्गीस दत्त फाउंडेशन नेहमीच कार्यरत असून आदिवासी सेवा समिती बरोबर भविष्यातही चांगले काम उभे करू, असे प्रतिपादन माजी खासदार व नर्गीस दत्त फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया दत्त यांनी केले.

नर्गीस दत्त माध्यमिक विद्यालय इमारतीच्या नूतनीकरण उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोलचा गजर आणि लेझीमच्या तालावर प्रिया दत्त यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्या मंदिराचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून विश्वस्त संपदा हिरे उपस्थित होत्या. या वेळी दत्त फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना दप्तर व विविध शैक्षणिक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही. एस. मोरे यांनी हिरे घराणे व दत्त घराण्याच्या जुन्या मैत्रीपूर्ण संबंधांना उजाळा दिला. तसेच संस्थेमार्फत सामाजिक जाणिवेतून अधिकाधिक उत्तम विद्यार्थी घडवण्याचा मानसही व्यक्त केला. आदिवासी सेवा समितीचे राजेश शिंदे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आर्थिक बाबींचा उल्लेख केला. माजी प्राचार्य डॉ. हरीश आडके, श्रीशक्ती शैक्षणिक संस्थेचे सचिव दीपक सोनवणे, शाळेचे मुख्याध्यापक राजेश बडोगे, संस्थेचे विश्वस्त आणि संचालक, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख प्रा. विद्या सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com