NCP News; भाजपवासी अमृता पवार यांनी राष्ट्रवादीला निष्ठा शिकवू नये!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे छगन भुजबळ यांच्यावरील टिकेला उत्तर दिले.
ChhaganBhujbal & Amruta Pawar
ChhaganBhujbal & Amruta PawarSarkarnama

नाशिक : (Nashik) भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केलेल्या अमृता पवार (Amruta Pawar) यांनी पक्षनिष्ठेविषयी शिकवू नये, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे. अमृता पवार जिल्हा परिषदेला (ZP) `राष्ट्रवादी`च्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतली. त्या भाजपच्या अनेक कार्यक्रमात तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारात थेट सहभागी झाल्या होत्या. (Amruta pawar shall not teach us Loyalty says NCP Office bearers)

ChhaganBhujbal & Amruta Pawar
Cantonment Elections; बंडखोर खासदार हेमंत गोडसेंची पहिली अग्नीपरीक्षा!

यासंदर्भात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातून पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. यामध्ये नुकत्याच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या अमृता पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना भाजपला मदत केल्याचा आरोप केला आहे.

ChhaganBhujbal & Amruta Pawar
Amruta Pawar News: `राष्ट्रवादी`ला धक्का...मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवार यांचा भाजप प्रवेश?

पत्रकाचा आशय असा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करतांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांनी पक्ष प्रवेश करतांना केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत.

कॉंग्रेस मधून बाहेर पडत ज्येष्ठ नेते शरद यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेऊन अनेकांनी त्यांना साथ दिली. त्यामध्ये सर्व प्रथम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे होते. त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर असतांना देखील त्यांनी ती संधी धुडकावून शरद पवार यांना खंबीर साथ दिली. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस घराघरात पोहोचविण्यासाठी भुजबळ रात्रंदिवस फिरले.

ChhaganBhujbal & Amruta Pawar
Nashik Loksabha; अमृता पवार ठरू शकतात लोकसभेच्या गेम चेंजर!

पत्रकात पुढे म्हटले आहे की, अमृता पवार या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या तिकिटावर देवगाव गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. मात्र त्यांनी या संपूर्ण कार्यकाळात पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली. त्या कायमच भाजपच्या संपर्कात राहिल्या.

केवळ सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि मनात द्वेष ठेऊन त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाला कुठलाही फरक पडणार नाही. या पत्रकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा योगिता आहेर, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांची नावे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com