अमरीशभाई पटेल म्हणाले `मला २५० हून अधिक मते मिळतील`
Amrishbhai Patel & Gaurav Wani with supportersSarkarnama

अमरीशभाई पटेल म्हणाले `मला २५० हून अधिक मते मिळतील`

धुळे विधान परिषद मतदारसंघासाठी पाच जणांचे अर्ज दाखल

धुळे : धुळे- नंदूरबार विधान परिषदेच्या निवडणुकीत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहा जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजपचे विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल (Amrishbhai Patel) आणि महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी (Gaurav Wani) यांनी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते.

Amrishbhai Patel & Gaurav Wani with supporters
राज्यातील दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी

आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांत आमदार अमरीशभाई पटेल व त्यांचे बंधू भूपेश पटेल तसेच महाविकास आघाडीचे श्री. वाणी आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर, अशोक शंकर पाटील आणि नंदूरबारचे अपक्ष नगरसेवक दिपक दिघे यांनी अपक्ष असे सहा अर्ज आहेत. यातील श्री. भूपेश पटेल व श्री. सनेर यांनी पर्यायी (डमी) अर्ज दाखल केल्याचे बोलले जाते.

Amrishbhai Patel & Gaurav Wani with supporters
‘वंचित’चे कार्यकर्ते महापालिका निवडणुकांसाठी सज्ज!

आमदार पटेल यांनी आपल्या समर्थकांसह सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, खासदार डॅा सुभाष भामरे, खासदार डॅा हिना गावीत, राजवर्धन कदमबांडे, दिपक पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, महापौर प्रदिप कर्पे, आमदार विजयकुमार गावित, काशिराम पवार आदी होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर श्री. पटेल यांनी सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून सहकार्य करावे. विकासासाठी भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. २५० पेक्षा अधिक मते मला मिळतील. सातत्याने जनतेशी संपर्क तसेच विकासासाठी कटीबद्ध असल्याने सर्व मतदार पुन्हा एकदा निश्चित विश्वास व्यक्त करतील. आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.

महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समवेत आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष हिलाल माळी आदी होते.

....

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in