अमित शहांना काश्मिरी पंडीतांपेक्षा आयपीएल जास्त महत्वाची वाटते!

काश्मिरी पंडीतांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शहरात निदर्शने करण्यात आली.
अमित शहांना काश्मिरी पंडीतांपेक्षा आयपीएल जास्त महत्वाची वाटते!
Shivsena agitation at NashikSarkarnama

नाशिक : काश्‍मिरी पंडितांवर (Kashmiri Pandit) होणाऱ्या हल्ला विरोधात शिवसेनेतर्फे (Shivsena) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी पंचवटी कारंजा येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांवर अतिरेकी हल्ले होत आहेत. त्यात अनेक हिंदूंवर भरदिवसा गोळ्या घालून हत्या होत आहेत. (Shivsena agitation in nashik on Kashmiri pandit issue)

Shivsena agitation at Nashik
हक्काचा माणूस म्हणून मला हाक द्या!

३७० कलम हटवून उदोउदो करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना सदर प्रकरण हाताळता आले नाही. काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले, असून काश्मीरमधील हिंदू दहशती जगत आहेत. अनेक हिंदू पुन्हा काश्मीर सोडत आहेत.

Shivsena agitation at Nashik
महसूलच्या प्रत्येक बदलीत एक-दीड कोटींची वसुली!

काश्मिरमध्ये अशी तणावाची स्थिती असताना देशाचे गृहमंत्री मात्र आयपीएलचे सामने बघण्यात व्यस्त आहेत. स्वतःला हिंदूंचे सरकार म्हणणाऱ्या भाजपशासित सरकारने या होणाऱ्या हल्ल्याबाबत जनतेला उत्तर द्यावे व तातडीने काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खातमा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काश्मिरी पंडीतांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या पंचवटी विभागाने पंचवटी कारंजा येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी पाकिस्तान राष्ट्रध्वज, अतिरेक्यांचा पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

विधानसभाप्रमुख योगेश बेलदार, महानगर संघटक दिगंबर मोगरे, विशाल कदम, उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी, शैलेश सूर्यवंशी, सुनील निरगुडे, शिवसेना महिला आघाडी शोभा मगर, मंगला भास्कर, मनिषा हेकरे, शोभा गटकळ, ज्योती देवरे, संजय थोरवे, महेंद्र बडवे, हर्षद पटेल, युवासेनेचे रूपेश पालकर, वैभव खैरे, संजय पिंगळे, सचिन धोंडगे, बब्बू गोसावी, संदीप लभडे, राहुल देशमुख, पोपट शिंदे, जगन गोरे, युवासेनेचे कल्पेश पिंगळे, महेश मते, प्रमोद घोलप, योगेश गांधी, शोभा दिवे, ज्योती कुमावत, भारती बोढाई आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in