मी मूक प्रेक्षक बनून स्वस्थ बसणार नाही : अमित शहांचा महाविकास आघाडीला थेट इशारा

विखे पाटील (Vikhe Patil) यांनी आयोजित केलेल्या सहकार परिषदेत अमित शहांचे घणाघाती भाषण
Amit Shah

Amit Shah

Sarkarnama 

नगर : देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सहकार पंढरीत येऊन राज्य सरकारला कानपिचक्या दिल्या. महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Govt) थेट भाषेत इशारा देऊन या सरकारने पक्षपातीपणा करण्याचे सोडून द्यावे. मी येथे मूक प्रेक्षक बनून राहणार नाही, याची थेट जाणीव त्यांनी करून दिली.

<div class="paragraphs"><p>Amit Shah</p></div>
आणि जिल्हा बॅंका व कृषी संस्थांच्या संचालकांना मिळाले जीवदान ...

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या सहकार परिषदेत आणि शेतकरी मेळाव्यात शहा यांनी आज जोरदार भाषण केले. मी सहकारमंत्री झाल्यानंतर अनेकांनी माझ्याविषयी शंका व्यक्त केल्या. मला सल्ले देण्यास सुरवात केली. खरे तर त्यांनी मला सल्ले देण्याऐवजी स्वतःकडे पाहिले असते तर सहकाराची परिस्थिती सुधारली असती. माझ्याकडे हे खाते आले असले तरी मी पक्षपाती पद्धतीने निर्णय घेणार नाही. सहकारी संस्थेचे नेतृत्व हे कोणत्या राजकीय विचारधारेशी जोडलेले आहे, याचा विचार मी करणार नाही. मात्र येथील महाविकास आघाडी सरकार निर्णय घेताना पक्षपाती पद्धतीने निर्णय घेत आहे. हे मी मूक प्रेक्षक म्हणून पाहणार नाही.``

<div class="paragraphs"><p>Amit Shah</p></div>
अमित शहांची मोठी घोषणा : जिल्हा बॅंकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण येणार!

सहकार चळवळीला नवीन दिशा देण्यासाठी मोदी सरकारने सहकार खाते निर्माण केले आहे. सहकारी चळवळीशी अधिकाधिक लोक जो़डले जावेत, याचा विचार मी करणार आहे. सहकारी संस्था स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, याचा विचार करायला हवा. किती दिवस सरकारी मदतीवर या संस्था चालवायच्या, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. `अमूल`सारखी संस्था जगभरात आपला ब्रॅंड निर्माण करत असेल तर इतर संस्थांना ते का जमू नये? माझ्याकडे सहकार खाते आल्यानंतर साखर कारखान्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले. मोदी सरकारही त्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी या व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com