अंबादास दानवे यांनी नुकसानग्रस्तांच्या भेटीसाठी केला ट्रॅक्टरने प्रवास

सिन्नरला पूरग्रस्तांबाबत राज्य सरकारने निष्काळजीपणा केल्याचा आरोप दानवे यांनी केला.
Ambadas Danve at Sinner
Ambadas Danve at SinnerSarkarnama

सिन्नर : शहरासह तालुक्यात (Sinner) ढगफुटीसदृश्य (Cloudburst) पावसामुळे शेतीसह, (Farmers) दुकान, घरे, कार व दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पाहणी केली. यावेळी थेट नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टरमध्ये वसून प्रवास केला. (Shivsena leader Ambadas Danve travel by tractor to reach affected farmers)

Ambadas Danve at Sinner
MVP News: नितीन ठाकरे यांनी शरद पवारांची दिशाभूल केली!

महापुराला पाच दिवस उलटले तरी पूरग्रस्तांचे पंचनामे झालेले नाहीत. पूरग्रस्तांना त्वरित मदत देणे गरजेचे असून, प्रशासन व शासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. यातून सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो, असा टोला श्री दानवे यांनी यावेळी लगावला. सरकारने तत्काळ मदत करुन पूरग्रस्तांचे उघड्यावर पडलेले संसार पुनर्स्थापित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Ambadas Danve at Sinner
Ambadas Danve : अमित शाहांना मुंबईत यावे लागले हा तर शिवसेनेचा नैतिक विजय !

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने सरस्वती नदीला आलेल्या महापुरामुळे व्यावसायिकांसह जवळपास शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. सोनांबे शिवारातील गुरदरी बंधारा फुटल्याने बंधाऱ्यासह शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. माजी आमदार राजाभाऊ वाजे, सरपंच डॉ. रवींद्र पवार यांच्या मागणीनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी सिन्नर व सोनांबे येथे भेट देऊन पाहणी केली.

शहरातील देवी रोड, नाशिक वेस, नेहरू चौक, गावठाण, वंजारी गल्लीत श्री. दानवे यांनी नुकसानीची पाहणी केली. आमचे स्वयंपाकाचे साहित्य, भांडी वाहून गेल्याने स्वयंपाक करण्यासाठी काहीच उरले नाही, असा टाहो पूरग्रस्तांनी फोडला. त्यावर श्री. दानवे यांनी प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा यांना सूचना दिल्या. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून उज्वला गॅस योजनेतून गॅस शेगडी व संसारोपयोगी भांडी देण्याचे आदेश दिले.

दरम्यान, सोनांबे येथे भेट देऊन श्री. दानवे यांनी अतिवृष्टीने फुटलेल्या बंधाऱ्याच्या नुकसानीची पाहणी केली. घरांची पडझड, पिकांबरोबरच वाहून गेलेली शेती, शेतीसाहित्य आणि पावसाचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करा, अशा सूचना श्री. दानवे यांनी प्रशासनाला केल्या.

ट्रॅक्टरने प्रवास

सोनांबे गावाच्या दक्षिणेला मुख्य रस्त्यापासून जवळपास अर्धा ते एक किलोमीटर आत गुरदरी बंधारा आहे. तेथे कार पोचू शकत नसल्याने श्री. दानवे, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरने प्रवास केला. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ८.५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनविल्याचे सांगितले. तथापि, केवळ मातीचा भराव टाकून चालणार नाही. सुधारित अंदाजपत्रक करून त्यात कॉंक्रिटने कामाची तरतूद करावी, अशा सूचना श्री. दानवे यांनी दिल्या.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, युवानेते उदय सांगळे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, माजी नगरसेवक शैलेश नाईक, सोमनाथ पावसे, अनिल सरवार, मनोज भगत, प्रमोद चोथवे, संतोष शिंदे, प्रशांत रायते, प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा, मुख्याधिकारी संजय केदार, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार, माजी सरपंच संजय बोडके, विकास पवार, सुभाष जोर्वे, पोलिसपाटील चंद्रभान पवार, नागेश्वर पवार, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दामोधर बोडके, सोमनाथ पवार, अनिल पवार, योगेश पवार व शेतकरी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com