प्रगती हवी, तर विकास करणाऱ्याच्या पाठिशी राहावे लागेल!

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मतदारांना सांगितले विकासाचे सूत्र.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

मोहाडी : निवडणुकीत अनेक उमेदवार येतात. त्यांना नीट पारखून घेतले पाहिजे. केवळ घोषणा व प्रचारकी थाटात वावरणारे प्रभाव टाकतील, मात्र आपण मत देताना केवळ आपल्या परिसराच्या विकासाची क्षमता असलेल्यांनाच निवडले पाहिजे. असे केले तर गावाचा विकास नक्की होईल, असा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला.

Chhagan Bhujbal
मुख्यमंत्री, शरद पवारांसह सर्व भक्कमपणे नवीब मलिकांच्या पाठिशी!

श्री भुजबळ म्हणाले, प्रत्येक मतदारांनी आपल्या गावाचा, गटाचा विकास करणाऱ्यालाचा निवडून द्यावे, जेणेकरून विकासाचा बॅकलॉग भरून निघेल.

राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जवळके (दिंडोरी) येथे आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजन व जिल्हा परिषदेच्या संगणक हॉलचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते.

Chhagan Bhujbal
गिरीश महाजनांची व्यूहरचना शिवसेनेची मुसंडी रोखू शकेल?

यावेळी जऊळके दिंडोरी येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक संगणक लॅबचे लोकार्पण श्री. भुजबळ यांनी केले. येथील सैक्षणिक वातावरण आणि सुविधा तसेच तुकाराम जोंधळे यांनी केलेल्या विकासकामांचे श्री. भुजबळ यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ग्रामीण भागातील या शाळेत असा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याने जोंधळे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असल्याचे गौरवोद्गरा त्यांनी काढले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, शंकरराव काठे, राष्ट्रवादी युवका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शाम हिरे, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे, विस्ताराधिकारी जिभाऊ शेवाळे, गटशिक्षण अधिकारी भास्कर कनोज, जवळके दिंडोरीच्या माजी सरपंच भारती जोंधळे, मधुकर केदारे, जानोरीचे उपसरपंच गणेश तिडके आदी वनारवाडीचे उपसरपंच दत्तू भेरेआदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com