धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अमरीशभाईंच्या जाळ्यात अडकली?

महाविकास आघाडी सरकारला अस्थीर करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही.
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अमरीशभाईंच्या जाळ्यात अडकली?
Amrishbhai Patel, BJP leaderSarkarnama

धुळे : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Front) मंत्री व नेत्यांमागे राजकीय सुडबुद्धीने ईडी, सीबीआय, इकम टॅक्स या केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central investigation agencies) ससेमीरा लावणाऱ्या भाजपची संगत नको अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसना जळगावमध्ये घेतली. मात्र शेजारच्याच धुळे- नंदूरबारला सर्व पक्षीय पॅनेलचे सर्वाधिकार भाजपचे अमरिशभाई पटेल (BJP leader Amrishbhai Patel) यांना देण्यात आले. त्यामुळे भाजप बाबत ठोस राजकीय भूमिका काय? असा गोंधळ आले. येथेही शिवसेनेने गुगली टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) स्वतःच्याच जाळ्यात अडकला आहे.

Amrishbhai Patel, BJP leader
अशोक चव्हाण, थोरातांना जमेना, ते नाना पटोलेंनी करून दाखवले!

महाविकास आघाडी सरकारला अस्थीर करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. त्यासाठी सर्व संकेत पायदळी तुडवत त्यांच्याकडून रोज नवे आरोप होत आहेत. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात प्रारंभी काँग्रेसने व शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर न जाता स्वतंत्र पॅनेल करण्याची घोषणा केली. त्यात भाजपची चांगलीच कोंडी झाली होती.

Amrishbhai Patel, BJP leader
राजेश टोपेंना सवाल, `महाराष्ट्रात ७० टक्के गरोदर मातांचे सिझेरियन का होते?`

जळगाव जिल्हा बँकेबरोबरच शेजारच्या धुळे- नंदूरबार जिल्हा बँकेचीही निवडणूक प्रक्रीया सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. सर्वपक्षीय पॅनेल निर्मितीसाठी काल येथे महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांची बैठक काल येथे झाली. त्यात या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार मांडला. पॅनेलबाबत सर्वाधिकार भाजप नेते आमदार अणरिशभाई पटेल यांना दिले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील होते. त्यामुळे जळगावला भाजप राजकीयदृष्ट्या अस्पृष्य तर शेजारच्या धुळे जिल्ह्यात मित्र कसा? अशी चर्चा सुरु झाली आहे. येथे शिवसेना नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कणखर भूमिका घेत भाजपबरोबर जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे त्यांचे मन वळविण्यासाठी पुन्हा दोन्ही काँग्रेसचेच नेते प्रयत्नशील आहे. यंदा बँकेचे अध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्याला मिळावे, अशी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबारमधील काही नेत्यांची इच्छा आहे. ती किती फळास येते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रथम जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासह सर्वपक्षीय पॅनलचा प्रयत्न झाला. नंतर त्यातून काँग्रेसने माघार घेतल्याने तेथे भाजपविरोधात इतर विरोधक एकत्र आले. या धर्तीवर धुळे जिल्ह्यातूनही जिल्हा बँकेची स्थानिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रस्ताव मांडला गेला. जळगावइतकी प्रमुख राजकीय पक्षांची आक्रमकता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत नसल्याने ही निवडणूक येथे बिनविरोध होण्याची अटकळ बांधली जात आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातून निवडणुकीबाबत विविध पक्षीय सर्वाधिकार अमरिशभाईंना बहाल केले आहेत. ते धुळे आणि नंदुरबार विधान परिषद मतदारसंघाचे आमदार असल्याने स्थिती सावरतील, बरेच अडसर दूर करू शकतील, अशी अटकळ इतर नेत्यांना आहे. धुळे-नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीनिमित्त महाआघाडी आणि भाजपचे मिळून सर्वपक्षीय पॅनल होते का; की जळगाव बँकेच्या निवडणुकीप्रमाणे राजकीय ताटातूट होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. या सर्व घडामोडींमध्ये नेते अमरिशभाई, रघुवंशी आणि नंदुरबार जिल्ह्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.