Dada Bhuse; दादा भुसे यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन

जिल्हा बँकेकडून कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या लिलावाच्या विरोधात राजकीय पक्ष एकवटले
Raju Shetty & Dada Bhuse
Raju Shetty & Dada BhuseSarkarnama

नाशिक : (Nashik) जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पीककर्जाची (Farmers) थकबाकी वसुली व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे कमी करून लिलाव करण्याच्या कारवाईविरोधात सर्व शेतकरी संघटना, राजकीय पक्ष एकवटले आहेत. याबाबत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या घरासमोर १६ जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना (Raju Shetty) व थकबाकीदार शेतकरी व त्यांचे कुटुंब बिऱ्हाड आंदोलन करणार आहेत. (Swabhimani Shetkari Sanghtana agitaion against NDCC Bank in Front Of dada Bhuse`s House)

Raju Shetty & Dada Bhuse
Nashik News; संपादित जमिनी शेतकऱ्यांना तातडीने परत द्या!

या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवित स्वत: या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या आंदोलनाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. पालकमंत्र्यांविरोधात आंदोलन असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे.

Raju Shetty & Dada Bhuse
Surgana News; `माकप`च्या जे. पी. गावितांनी केले स्वामी समर्थ रथयात्रेचे स्वागत

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सहकारी सोसायटीमार्फत जवळपास ६२ हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे. जिल्हा बँक कर्ज वसुली करतांना अतिशय चुकीच्या मार्फत कर्ज वसुली करीत आहे. बळीराजा सात ते आठ वर्षापासून गारपिठ, पिकाला भाव नाही अशा अनेक आसमानी संकटापासुन त्रस्त आहे.

या सर्व संकटाना तोंड देत असतांना शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण, मुला-बाळाचे लग्न, तसेच प्रपंच या सर्व गोष्टी बघत असतांना जिल्हा बँकेची परतफेड झालेली नाही. या कारणाने जिल्हा बँक अतिशय चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची जुलमी वसुली करीत आहे. यात शेतकऱ्यांच्या जमीनीवर नाव लावणे व लिलाव करणे अशी प्रकिया राबवित असल्याचा आरोप करीत, याबाबत सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

येत्या १६ जानेवारी मालेगाव येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत. थकीत कर्जाची मुद्दल फेड करून घ्यावी, कर्जाचे पुनःगर्ठन करत गेल्याने शेतकऱ्यांची थकबाकी वाढत गेली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सरकारने अंदाजे ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी या मागण्यांसाठी शेतकरी बिऱ्हाड आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येणार आहे.

यामध्ये आता राजू शेट्टी यांनी सहभागी होण्याची माहिती दिली आहे. त्यासोबतच मोर्चात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. केवळ सहभागी व्हायचं म्हणून होऊ नका तर जोपर्यंत या विषयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करा असे आवाहन राजु शेट्टी यांनी केले आहे. यावेळी बँक करीत असलेल्या कारलाईची सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, गंगाधर निखाडे, प्रशांत कड, राजेंद्र महाले, संतोष रेहरे आदींनी यांनी राजू शेट्टी यांना दिल्यानंतर त्यांनीही या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहिर केले असल्याने या आंदोलन ऐतिहासिक ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com