भुजबळ-कांदे वादाला वेगळे वळण; निकाळजे म्हणतो, आमदार सुहास कांदे यांच्यावर गुन्हा दाखल करा!

पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात वाद सुरु आहे.
MLA Suhas Kande & Akshay Nikalje
MLA Suhas Kande & Akshay NikaljeSarkarnama

नाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (MLA Suahas Kande) यांनी भुजबळ (Chhagan Bhjujbal) यांच्या विरोधातील खटला मागे घ्यावा म्हणून मी फोन केला अशी तक्रार केली होती. ते पुर्णतः खोटे आहे. श्री. कांदे एकही पुरावा देऊ शकलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे मुंबई अध्यक्ष अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांनी आज केली.

MLA Suhas Kande & Akshay Nikalje
गिरीश महाजनांनी अद्वय हिरेंकडे नेतृत्व सोपवून `राष्ट्रवादी`ला साईड ट्रॅक केले

पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव मतदारसंघातील विकासनिधीच्या वितरणावरून वाद सुरु आहे. यासंदर्भात आमदार कांदे यांनी श्री. भुजबळ यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून अंडरवर्ल्ड डॅान छोटा राजन यांचा पुतन्या अक्षय निकाळजे याने आपल्याला धमकीचा फोन केला, अशी तक्रार श्री. कांदे यांनी नाशिकच्या पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्यासंदर्भात आज श्री. निकाळजे यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली.

MLA Suhas Kande & Akshay Nikalje
छगन भुजबळांनी उचलला साहित्य संमेलन सर्वात्कृष्ट करण्याचा विडा!

पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यावर श्री. निकाळजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी आज पोलिस आयुक्तांची भेट घेतली. याबाबतचा जबाब मी गंगापुर पोलिस ठाण्यात दिलेला आहे. आज फक्त त्यासंदर्भात नेमेक काय घडले याची माहिती देण्यासाठी आयुक्त पांडे यांची भेट घेतली. त्यांना सर्व माहिती दिली. त्यांनी आम्हाला खुप चांगले सहकार्य केले. येत्या शुक्रवारपर्यंत या तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

श्री निकाळजे म्हणाले, माझे सुहास कांदे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. मात्र ते एका डॅाक्टरसह कार्यकर्त्यांना श्री. कांदे यांच्या माणसांनी मारहान केली. त्याबाबत फोन केला होता. त्यात अन्य कोणताही विषय नव्हता. धमकीचा तर विषयच नाही. याबाबत श्री. कांदे यांनी तक्रार केली मात्र ते एकही पुरावा किंवा रेकॅार्डींग देऊ शकलेले नाही. त्यांनी हे जे प्रकरण घडवले त्याचा मला खुप त्रास झाला. अनेक दिवस त्याच्या बातम्या माध्यमांत येत होत्या. त्यामुळे मला खुप मानसिक त्रास झाला. माझ्या प्रतिमेला तडा गेला. त्यासाठी मी आमदार कांदे यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार आहे. त्यांनी तत्थ्यहीन तक्रार करून माझा व पोलिसांचा वेळ वाया घालवला. त्याबाबत त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी केली आहे. त्याचे काय होते, याची मी वाट पहात आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com