भुसावळचा बालेकिल्ला उध्वस्त ; आता गिरीश महाजन कोणता डाव टाकणार?

नगराध्यक्ष रमण भोळेंसह भाजपच्या २१ नगरसेवकांनी हातावर बांधले घड्याळ
Ajit Pawar & Girish Mahajan

Ajit Pawar & Girish Mahajan

Sarkarnama

भुसावळ : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा जळगाव (Jalgaon) दौऱ्याने स्थानिक राजकीय समिकरणे व भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे राजकीय वर्चस्व दोन्हींना शुक्रवारी चांगलाच हादरा बसला. त्यामुळे आगामी काळात एकनाथ खडसेंच्या डावपेंचांनी श्री. महाजन यांची झोप उडण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar &amp; Girish Mahajan</p></div>
संजय पवारांचे शिवसेना, भाजप अन् राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचे वर्तुळ पूर्ण!

उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या दौऱ्यात भुसावळचा भाजपचा किल्ला सर केला. आता यापुढे काय घडते, भाजप सावध होते की आणखी काही बिनीचे शिलेदार राष्ट्रवादीच्या गळाला लागतात याची उत्सुकता वाढली आहे.

भुसावळ शहरासह तापी परिसरात भाजपला खिंडार पडले असून भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह भाजपच्या २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभेत भाजपच्या नगरसेवक व तालुक्यातील पदावरील कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar &amp; Girish Mahajan</p></div>
उद्धव ठाकरेंवर टीका करता, नितेश राणे आधी तुमची उंची पहा?

भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडताना २१ नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का बसला आहे. भाजपच हे मोठे डॅमेज आहे.

नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेविका शैलजा नारखेडे, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, नगरसेवक अमोल इंगळे, नगरसेविका प्रतिभा पाटील, नगरसेवक मुकेश पाटील, नगरसेविका लक्ष्‍ मकासरे, सविता अहिरे, अरुणा सुरवाडे, पुजा सूर्यवंशी, शेख सईदा शेख शफी, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोणते, सुषमा पाटील, संगिता देशमुख. याशिवाय युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सुधीर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जतीन वेडे निलेश रायपुरे, सरपंच खडके, विलास सपकाळे, भाजपचे नगरसेवक हेमराज चौधरी, अनिता चौधरी यांनी प्रवेश घेतला.

बोदवड पंचायत समितीचे सदस्य किशोर गायकवाड, दिपाली राणे, गणेश पाटील, प्रतिभा हीकारे, मुक्ताईनगर पंचायत समितीचे सभापती विकास पाटील, सदस्य सुवर्णा साळुंखे, योगिता वानखेडे, सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनिता येवले, उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, गटनेता अजय भारंबे, नगरसेविका करुणा पाटील, नगरसेविका नंदाताई लोखंडे, नगरसेविका जयश्री नेते, नगरसेविका सगीर आधी सय्यद तुकडु, नगरसेविका शबाना मुराद तडवी यांनी प्रवेश केला.

बाजार समितीच्या सभापती निवृत्ती पाटील, संचालक रामदास पाटील, कैलास पाटील, भगवान पाटील, विलास धायडे, अनिल वराडे, रंजना कांडेलकर, लक्ष्मीबाई पाटील, सुरेंद्र पाटील, सुभाष पाटील, भीमराव पाटील, प्रभाकर झोपे, राजेंद्र माळी यांचाही समावेश आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com