खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जळगावात

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा बँक पक्षाच्या ताब्यात आली आहे,त्यात शिवसेना,काँग्रेस भागीदार आहे.अशा स्थितीत अजितदादा कार्यकर्त्यांना काय संदेश देणार या कडे लक्ष आहे.
Eknath Khadse, Ajit Pawar

Eknath Khadse, Ajit Pawar

sarkarnama

जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे, ते कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देणार याकडे आता लक्ष आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव दौरा नेहमी मार्गदर्शक ठरला आहे, ते जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री आहेत, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून ते प्रथमच जळगाव जिल्हा दौरा करीत आहेत. शुक्रवारी (ता. १७) ते जळगाव जिल्ह्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी याबाबत ही माहिती दिली.

अॅड. रवींद्र पाटील म्हणाले की, सकाळी ८ वाजता अजित पवार विमानाने जळगाव विमान तळावर येणार आहेत. तेथून अजिंठा विश्रामगृहावर ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील, सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी बैठक घेतील, त्यानतंर जिल्हा दूध विकास संघाच्या नवीन दूध प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्यानतंर ते भुसावळ येथे रवाना होतील त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केवळ एक आमदार निवडून आला आहे, भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा बँक पक्षाच्या ताब्यात आली आहे,त्यात शिवसेना,काँग्रेस भागीदार आहे.अशा स्थितीत अजितदादा कार्यकर्त्यांना काय संदेश देणार या कडे लक्ष आहे.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse,&nbsp;Ajit Pawar</p></div>
जो बायडन, पुतिन यांना मोदींनी मागे टाकले.. ओबामा पहिल्या क्रमांकावर

जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank Election Results) संचालक पदाच्या नुकतीच निवडणुक झाली. यात राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, व कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या सहकार गटाने यश मिळविले व अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) झाले.

जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुलाबराव देवकर, संचालक डॉ.सतीश पाटील (Satish Patil) व आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिल्ली येथे निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची नुकतीच भेट घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com