खडसेंच्या विजयासाठी अजितदादांचा आटापिटा : आमदारांच्या बैठका; समजूत अन् तंबी

Eknath Khadse | NCP | Ajit Pawar : भाजपच्या डोक्यात खडसेंचा गेम? : नाथाभाऊंना आमदार करण्याचा अजितदादांचा निर्धार
खडसेंच्या विजयासाठी अजितदादांचा आटापिटा : आमदारांच्या बैठका; समजूत अन् तंबी
Eknath Khadse, Ajit Pawarsarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) गारद केल्यानंतर भाजपने (BJP) आता माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) आणि पर्यायाने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर निशाणा लावल्याचे वृत्त आहे. विधानसभेतील विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासाठीची सारी सूत्र त्यांचे विश्वासु सहकारी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे सोपविली असल्याचेही सांगण्यात येत आहे.

पण या पाडापाडीच्या राजकारणात खडसेंचा आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचाच घात होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रणनीतीचा 'रिमोट' स्वत:कडे घेतला आहे. त्यातही राज्यसभेत महाविकास आघाडीसोबत झालेला दगाफटका आणि आता विधान परिषदेला असेलेले गुप्त मतदान या पार्श्वभूमीवर अजित पवार अधिक सतर्क झाल्याचे दिसून आले. (Eknath Khadse | Vidhan Parishad Latest News)

Eknath Khadse, Ajit Pawar
आमदार विनोद अगरवाल यांनी 'मविआ'तून 12 दिवसांत मारली उडी; भाजपचे 1 मत प्लस

याचा प्रत्यय आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना आला. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र निवडणूकीला सामोरे जाण्यापूर्वी आज महाविकास आघाडी आणि भाजपने आपआपल्या आमदारांना मतदानाचे प्रशिक्षण दिले. याशिवाय व्हीप देखील काढले. या निवडणुकीत भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी जवळपास 20 मतांची गरज आहे.

तर काँग्रेसला त्यांचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 8 मतांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकडे पुरेशी मते असली तर एकनाथ खडसेंना मतदान होऊ नये यासाठी भाजप विशेष प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याच गोष्टीची पूर्ण जाणिव असलेल्या अजित पवार यांचा खडसेंच्या विजयासाठी आज दिवसभर आटापिटा चालला होेता. अजित पवार यांनी दिवसभरात राष्ट्रवादीसोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकांचा सपाटा लावला होता. (Eknath Khadse | NCP| Vidhan Parishad Latest News)

Eknath Khadse, Ajit Pawar
भाजपच्या किमान 9 मतांना राष्ट्रवादी लावणार सुरुंग; प्रसाद लाड यांचा पराभव निश्चित?

या बैठकांमध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यावर त्यांना या अडचणी दूर करण्याचे आश्वासन देखील दिले. शिवाय राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना व्हिप प्रमाणे मतदान करण्याची तंबी दिली. मत फुटल्यास किंवा दगाफटका झाल्यास आणि दुसऱ्या उमेदवाराचा अर्थात खडसेंचा पराभव झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होतील असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी आमदारांनाा दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in