BJP News: आम्ही अमेठी जिंकली, बारामती काही फार अवघड नाही!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, अजितदादा, सुप्रियाताईंनी फारच मनाला लावून घेतले.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar BavankuleSarkarnama

नाशिक : मी बारामतीत (Baramati) गेल्यावर फक्त, `बारामतीत घडी बंद पडेल` एव्हढेच म्हटले होते. अन्य काहीही टिका केली नाही. मात्र शरद पवार, (Sharad Pawar) अजितदादा, (Ajit Pawar) सुप्रियाताई (Supriya Sule) या सगळ्यांनी फारच मनाला लाऊन घेतले. खरं तर त्यांनी माझे विधान एव्हढे गांभिर्याने का घेतले, हेच समजत नाही. आम्ही अमेठी घेतली आहे, बारामतीही घेऊ शकतो, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केले. (BJP claim If we winin Amethi, we could be in Baramati also)

Chandrashekhar Bavankule
MVP News: दर तीन महिन्यांनी शरद पवारांची भेट घेऊ!

श्री. बावनकुळे आज नाशिकला होते. यावेळी त्यांनी संपादक व निवडक पत्रकारांशी संवाद केला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले, शरद पवार चाळीस वर्षे राजकारणात आहेत. बारामती मतदारसंघ कायम त्यांच्याकडे राहिला आहे. त्यांचे बारामतीचे विकासाचे मॅाडेल म्हणजे, बारामती शहराचा विकास एव्हढाच आहे. संपुर्ण मतदारसंघाचा विकास झालेला नाही. बारामतीचा विकास म्हणजे पुरंदरचा विकास नव्हे. बारामतीचा विकास म्हणजे हवेलीचा विकास नव्हे. दौंडचा विकास नव्हे, भोरचा विकास नव्हे. कारण मतदारसंघातील हे भाग अद्यापही विविध समस्याग्रस्त आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ती त्यांना सोडवता आलेली नाही. त्यामुळे विकासाचा दावा तेव्हढा बरोबर नाही.

Chandrashekhar Bavankule
शेकडो वर्षांनंतर समोर आले अलौकीक आदिपीठातील आदिमायेचं रूप!

भाजपने देशातील १२० लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात राज्यातील विविध मतदारसंघ आहेत. त्यात पुढील अठरा महिन्यात केंद्रातील मंत्री सहा वेळा भेट देतील. एकवीस प्रकारचे कार्यक्रम करतील. प्रश्न सोडवतील. त्यातबारामतीची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे आहे. त्याचे नियोजन मीच केले आहे. त्याप्रमाणे तीथे कार्यक्रम होतील.

ते पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाला संघटनात्मक विकासव बांधनी करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही कार्यक्रम आखला आहे. आम्ही यापुर्वी अमेठीवर लक्ष केंद्रीत केले होते. ए फॅार अमेठी तर बी फॅार बारामती काय अवघड आहे. आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकून दाखवू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in