Jalgaon News | Ajit Pawar| Gulabrao Devkar
Jalgaon News | Ajit Pawar| Gulabrao DevkarSarkarnama News

Jalgaon Politics : अजित पवारांनी थोपवले गुलाबराव देवकरांचे बंड; विरोधकांशी करणार होते हातमिळवणी

गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत गुलाबराव देवकरांच्या गळ्यात बॅंकेच्या अध्यक्षपदाची माळ पडली होती

Jalgaon Politics : वर्षभरापूर्वी सुत्रे हाती घेतलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. देवकर आणि त्यांच्या समर्थकांनी हात मिळवणी करुन बंडखोरीची तयारी केली होती. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांना या बंडाची माहिती कळताच त्यांनी शिताफीने देवकरांचे बंड थोपवून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर देवकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत गुलाबराव देवकरांच्या गळ्यात बॅंकेच्या अध्यक्षपदाची माळ पडली. पण महाविकास आघाडीत झालेल्या करारानुसार एक वर्षानंतर चेअरमन बदलाच्या हालाचाली सुरू झाल्या. पण या हालचाली देवकरांना मान्य नव्हत्या. अध्यक्षपदाची मिळालेलली संधी ही अधिक काळ टिकावी म्हणून देवकरांनी लॉबिंग करायला सुरूवात केली.

Jalgaon News | Ajit Pawar| Gulabrao Devkar
Ambadas Danve : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर दानवेंचा गंभीर आरोप, म्हणाले,''शिंदे गटातील...''

संचालकांच्या बैठकीनंतर देवकर सोमवारी (६ फेब्रुवारी) राजीनामा देणार होते. पण सोमवारी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा न दिल्याने एकच गोंधळ उडाला होता. सत्ताधारी भाजप-शिंदे गटाशी हातमिळवणी करून अध्यक्षपद टिकवता येईल का? यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. पण यात यश येणार नाही हे कळल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिष्टमंडळ नेऊन अध्यक्षपद वाचविण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जाते.

पण दुसरीकडे,देवकर विरोधकांशी हातमिळवणी करून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ही माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांना कळताच त्यांनी त्यांच्या स्टाईलने देवकरांचे बंड काही क्षणातच उलथवून लावले. त्यानंतर मंगळवारी देवकरांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

खरंतर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद हे मोठे प्रतिष्ठेचे मानले जाते. या प्रतिष्ठेपायी गेल्या वर्षी निवडणुकानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील सात वर्ष चेअरमन राहिलेल्या त्यांच्या कन्येसाठी पुन्हा लॉबिंग केली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आले आणि गुलाबराव देवकरांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com