शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार हे अजित पवारांनी स्पष्टपणेच सांगितले

अपयश झाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
Ajit Pawar Eknath Shinde-Devendra Fadnavis
Ajit Pawar Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama

श्रीरामपूर : लाखो तरूणांना ज्या मोठमोठ्या प्रकल्पातून नोकरी मिळणार होती ते प्रकल्प राज्याबाहेर गेले. आणि आता म्हणताहेत आम्ही नवीन प्रकल्प आणून भरती करणार आहोत. जर प्रकल्प येणार असतील तर त्यांची यादी दाखवा, असे आवाहन करत अपयश झाकण्यासाठी शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. (Ajit Pawar clearly said when the Shinde-Fadnavis government will fall)

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय 'राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा' शिबिरासाठी अजित पवार आले आहेत. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार भरती करणार असल्याची घोषणा करत आहेत. मात्र, लाखो तरूणांना ज्या मोठमोठ्या प्रकल्पातून नोकरी मिळणार होती ते प्रकल्प राज्याबाहेर गेले.

Ajit Pawar Eknath Shinde-Devendra Fadnavis
राष्ट्रवादीचे १२ नेते फुटले आहेत; फक्त प्रवेशाचा मुहूर्त बाकी आहे : शहाजी पाटलांचा गौप्यस्फोट

आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप शिंदे फडणवीस सरकार करत आहे. मात्र, आम्ही पुराव्यानिशी दाखवून दिलंय की, प्रकल्प कधी बाहेर गेले आहेत, असे सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले पत्रच दाखवले. जोपर्यंत १४५ चा आकडा शिंदे सरकारकडे आहे, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असा दावा अजित पवार यांनी यावेळी केला.

Ajit Pawar Eknath Shinde-Devendra Fadnavis
‘आवताडेंच्या रुपाने तुम्ही १०६ वा आमदार दिला अन्‌ महाआघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला’

शेतकत्यांना मदत देणार असल्याच्या केवळ घोषणा केल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्याकडे आज दमडा नाही, त्याच्याकडूनच पंचनामे करण्यासाठी पैसे घेतले जात आहेत. मग सरकार काय मजा बघतंय का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in