Ajit Pawar News : '' पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री...!''; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

Big Statement of NCP Leader : ''महाविकास आघाडीच्या ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा लढवणार...''
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Nashik : राज्यात गेल्या महिन्यांमध्ये महाविकास आघाडीसह भाजपच्या नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’म्हणून उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर विविध ठिकाणी लावण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही 'भावी मुख्यमंत्री' म्हणून पोस्टर झळकले आहेत. याचदरम्यान,पुढील दीड वर्षात अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील असं मोठं विधान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हतगडमध्ये शेतकरी कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar), विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यावेळी उपस्थित होते. याचवेळी झिरवाळ यांच्यासह कोकाटे यांनी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar
Cabinet Expansion : शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी? 'यांच्या'साठी मार्ग होणार खडतर...

अजित पवार काय म्हणाले..?

या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, अमुक एक मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वक्ते बोलले, पण भाषण करुन मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ पाहिजे. तसंच महाविकास आघाडी(MVA) च्या ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा लढवणार असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

''शिवसेनेशी गद्दारी करून हे...''

सध्याचे सरकार हे फोडाफोडीचे राजकारण करीत असून राज्यात व देशात जातीय दंगली घडविण्याचे काम सुरु आहे. फोडाफोडीचे राजकारण जास्त काळ टिकत नाही. आदिवासींच्या अनेक योजना बंद केल्या आहेत. शिवसेने(Shivsena)शी गद्दारी करून हे सरकार स्थापन झाले आहे. पन्नास खोके एकदम ओके असे आता बारके पोरेही बोलू लागली आहेत.

Ajit Pawar
Shivsena bjp Alliance : आगामी निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्याचं महत्वाचं टि्वट ; यापुढच्या काळात भाजपसोबत...

शेतक-यांच्या प्रश्नाकडे अक्षम्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले ती नुकसान भरपाई अद्यापही दिली नाही. अडचणीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. कांद्याला अनुदान जाहीर केले. मात्र, अद्याप तरी पदरात पडले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे हा प्रश्न भेडसावत आहे असंही पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com