Ajit Pawar: खारीक, बदाम खाऊ घालू का तुम्हाला!

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

जळगाव : कार्यकर्त्यांनी (Party Workers) आपल्या कामाने ताकद निर्माण केली पाहिजे, त्यांनी जर काम केले पक्षाला (NCP) त्याची दखल घ्यावीच लागते. काही कार्यकर्ते आपल्याला म्हणतात दादा आम्हाला ताकद द्या, (give us power) अरे काय खारीक, बदाम खाऊ घालू का तुम्हाला... असा टोला विरोधी पक्षनेते (Leader of opposition) अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना लगावला. (Ajit pawar guide workers to work in grassroot lavle)

Ajit Pawar
PI Bakale: बकालेंकडून मराठाच नव्हे, अन्य समाजांबद्दलही आक्षेपार्ह टिपणी?

यावेळी श्री. पवार यांनी ॲड. रोहिणी खडसे यांच्या जनसंवाद यात्रेचे कौतुक केले. कर्जत-जामखेड मतदार संघात रोहित पवार यांनी स्वत: काम करून यश मिळविले हे देखील त्यांनी आवर्जुन सांगितले.

Ajit Pawar
Eknath Shinde: खासदार हेमंत गोडसेंचा शिवसेनेला धक्का

श्री. पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी ते म्हणाले, की पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क ठेवला पाहिजे, जनतेत जाऊन कार्य केले पाहिजे. त्यामुळे पक्ष बळकट होईल. जर तुम्ही जनतेत जाऊन काम केले तर कितीही वादळे आली तरीही तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, जयंत पाटील आदींची या वेळी उदाहरणे देण्यात आली.

कार्यकर्त्यांनी कोणताही भेदभाव न करता एक दिलाने काम करावे, त्यामुळे यश तर मिळेलच परंतु विरोधकही वाकड्या नजरेने पाहणार नाहीत, असे सल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

विरोधकांवर तुटून पडा : खडसे

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे म्हणाले, की पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांनीही आक्रमक असले पाहिजे. त्यांनी एकी ठेवली पाहिजे, त्या माध्यमातून विरोधकांवर अत्यंत आक्रमकपणे तुटून पडले पाहिजे.

पाय खेचाखेची बंद करा : डॉ. पाटील

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले, पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांची पाय खेचाखेची बंद केली पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक नेत्यांने काम केले पाहिजे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या भागातून किती सदस्य निवडून आणणार याबाबत खात्रीने सांगितले पाहिजे.

यावेळी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीष पाटील, राजीव देशमुख, आमदार अनिल पाटील, ॲड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com