Asaduddin Owaisi News: `लव्ह जिहाद` विषयी बोलता, बेपत्ता महिला संदर्भात गप्प का?

Asaduddin Owaisi criticize PM Narendra Modi: असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधानांनी चित्रपटाचा प्रचार करणे दुर्दैवी अशी टिका केली आहे.
PM Narendra Modi & Asaduddin Owaisi
PM Narendra Modi & Asaduddin OwaisiSarkarnama

Asaduddin Owaisi News : ‘द केरला स्टोरी‘ हा अत्यंत वाह्यात पद्धतीचा चित्रपट बनविला असून देशाचे पंतप्रधान या चित्रपटाचा प्रचार करत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी खरमरीत टीका एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. (PM Narendra Modi is promoting a movie is unfortunate)

एमआयएमचे (AIMIM) धुळे (Dhule) शहराचे आमदार फारुक शाह (Farukh Shaikh) यांनी आयोजित केलेल्या मुस्लिम समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्ताने ते सोमवारी सायंकाळी धुळ्यात आले होते. या प्रसंगी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एका वाह्यात सिनेमाचा प्रचार करतात हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

PM Narendra Modi & Asaduddin Owaisi
Chhagan Bhujbal news : शिंदे गटाच्या आमदारांवर लक्ष का नाही ठेवले?.

‘द केरला स्टोरी‘ या चित्रपटाबाबत खासदार ओवैसी म्हणाले, की केरळची सत्य परिस्थिती अत्यंत वेगळी असून चित्रपटात दाखवलेली परिस्थिती चुकीची आहे. या पद्धतीने अत्यंत वाह्यात पद्धतीचा चित्रपट बनवला असून देशाचे पंतप्रधान त्याचा प्रसार करत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. खासदार शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मुद्दा असून आपण त्यावर काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांना विचारावे

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ होत आहे, याबाबत खासदार ओवैसी यांना विचारले असता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांना याबाबत विचारणा करायला हवी, उपमुख्यमंत्री फडणवीस हे लव्ह जिहाद याबाबत बोलतात. मात्र, बेपत्ता महिला संदर्भात बोलत नाहीत, अशी टीका खासदार ओवैसी यांनी केली.

PM Narendra Modi & Asaduddin Owaisi
Anil Parab News : ठाकरे गटाचे नेते अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, दापोली रिसॉर्ट प्रकरणी 'ही' अपडेट

मोदी फक्त टीका करतात काम मात्र करत नाहीत, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, समाजाचे अनेक प्रश्न आहेत, मात्र त्यावर ते काहीच बोलत नाहीत. केवळ मन की बात करतात. त्यात खरोखर त्यांच्या मनातले असते की सोयीचे तेवह्ढे ते बोलतात.

पावसाळ्यापूर्वी सभा घ्या

आपण सामुदायिक लग्न सोहळ्यात आलो असल्याने या सोहळ्यात राजकीय पार्टींचे लग्न लावणार नाही, अशी मिस्कील टिप्पणी करत राजकीय अंगाने बोलण्यासाठी पावसाळ्यापूर्वी एखादी सभा आयोजित करा, असे आवाहन खासदार ओवैसी यांनी आमदार श्री. शाह यांना उद्देशून केले. दरम्यान, लग्नानंतर घरदार, परिवार सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

PM Narendra Modi & Asaduddin Owaisi
Manipur Violence: शिंदे फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश; मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परतले

सामुदायिक विवाह सोहळा

सोमवारी रात्री नऊनंतर शहरातील ऐंशी फुटी रोड भागातील तिरंगा चौकाजवळ सामुदायिक विवाह सोहळा झाला. आमदार शाह, वाल्मीक दामोदर, शशिकांत वाघ, गुफरान पोपटवाले, शव्वाल अन्सारी, भोला शहा यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यात खासदार ओवैसी म्हणाले, की सामुदायिक विवाह सोहळ्यात २४ मुला-मुलींचे लग्न लावून आमदार शाह यांनी चांगले काम केले आहे. वधू-वरांना शुभेच्छापर संदेश देताना त्यांनी वधू-वरांच्या कुटुंबासह समाजाला आवाहन केले, की जी मुलगी आपले घरदार, परिवार सोडून सासरी येणार आहे, त्या मुलीची सासरच्या मंडळीने काळजी घ्यावी, सासरी येणाऱ्या मुलीनेही सासरच्या मंडळींची काळजी घ्यावी. खासदार ओवैसी यांच्याहस्ते कब्रस्तानसह तीन ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com