Ahmednagar जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर; 'त्या' सहा शिक्षकांना दाखवला थेट घरचा रस्ता

Ahmednagar ZP : शाळेत डमी शिक्षक नेमणे, कामात हलगर्जीपणा करणे भोवले...
Ahmednagar ZP
Ahmednagar ZP Sarkarnama

Ahmednagar ZP : प्राथमिक शाळेत परस्पर डमी शिक्षकांची नेमणूक करणे, पर्यवेक्षण कामात हलगर्जीपणा करणे, वर्गात मुलींची छेडछाड करणे, अशा अनेक तक्रारी आलेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना चांगलेच महागात पडले आहे.

जिल्ह्यातील या सहा शिक्षकांवर निलंबनाचा प्रस्ताव मागील आठवड्यात प्रस्तावित होता. त्यानंतर मंगळवारी प्रत्यक्षात संबंधीत शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यामध्ये दोन केंद्र प्रमुखांसह तीन उपाध्यापकांचा समावेश आहे.

Ahmednagar ZP
Maharashtra Politics : सुजय विखेंनी शक्यता व्यक्त केलेल्या राजकीय भूकंपाचे केंद्र नगर जिल्ह्यात की...?

यामध्ये पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील मांजरधाव प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने चक्क स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू होता असं शिक्षण विभागाच्या तपासणीत समोर आले होते. बाजीराव शंकर पानमंद असं या शिक्षकांचे नाव असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

Ahmednagar ZP
Anil Babar News : बारामतीत काय ठरलं होतं ? ; पडळकर-बाबर यांच्यात कलगीतुरा सुरु

तसेच पारनेर पंचायत समितीमधील केंद्रप्रमुख अविनाश गुलाब गांगर्डे यांच्यावर देखील याचा ठपका ठेवून त्यांचेही निलंबन करण्यात आले आहे. तसेच अशीच घटना संगमनेर तालुक्यातील कारेगाव येथील झेडपीच्या शाळेमध्ये देखील समोर आली होती.

रमेश शिवाजी आहेर नावाच्या शिक्षकांने बेरोजगार शिक्षकांची परस्पर नेमणूक करत अध्यापन करून घेतले होते. याबाबत आलेल्या तक्रारीनंतर गुप्तपणे तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. यानंतर आता या शिक्षकाला देखील निलंबित करण्यात आले आहे.

Ahmednagar ZP
Telangana News : विरोधकांची मोठ बांधायला सुरुवात ; काँग्रेस वगळून तिसऱ्या मोर्चासाठी..

या बरोबरच राहुरी तालुक्यातील एका शाळेत मुलींची छेडछाड केल्याचा ठपका मदन दिवे या शिक्षकावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर दिवे याला निलंबित करण्यात आले आहे. तर पारनेर तालुक्यातील पाडळी दर्‍या येथील शिक्षक पोपट फाफाळे या शिक्षकावरही मुलींची छेडछाड केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या फाफाळे याला निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, संगमनेरमधील (Sangamner) जवळे बाळेश्वर येथील केंद्र प्रमुख प्रभाकर रोकडे यांच्यावर पर्यवेक्षिय कामात हालगर्जीपणा केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणी रोकडे यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in