Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतरावरुन भाजपमध्येच वाद; सुजय विखे, पडळकर आमने- सामने

Rename Of Ahmednagar : ...तोपर्यंत राज्य सरकारनं नामांतराची प्रक्रिया सुरु करु नये!
Sujay Vikhe, Gopichand padalkar
Sujay Vikhe, Gopichand padalkar Sarkarnama

Sujay Vikhe Vs Gopichand Padalkar News : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिवाळी अधिवेशनात अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्यात यावं अशी मागणी केली होती. या मागणीनंतर आता औरंगाबाद, उस्मानाबादच्या मागोमाग अहमदनगरचे देखील नामांतर केले जाण्याच्या चर्चा झ़डू लागल्या आहेत. याचदरम्यान, अहमदनगरच्या नामांतरांवरुन भाजपमध्येच वाद निर्माण झाला असून खासदार सुजय विखे आणि आमदार गोपीचंद पडळकर आमने सामने आले आहेत.

अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी शहराच्या नामांतराच्या मु्द्द्यांवरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे.

विखे म्हणाले, अहमदनगरचे नामांतर करा अशी मागणी नगरवासियांकडून करण्यात आलेली नाही. मात्र, जिल्ह्याबाहेरील कोणी नामातंराविषयी मत व्यक्त केले म्हणून जर निर्णय घेतला गेला तर त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटतील. त्यामुळे नामांतराविषयी निर्णय घेताना नगरकरांचे मत विचारात घेणं देखील आवश्यक आहे. आणि जोपर्यंत ते काही मत देत नाही, तोपर्यंत राज्य सरकारनं नामांतराची प्रक्रिया सुरु करु नये अशी भूमिका विखे यांनी मांडली आहे.

Sujay Vikhe, Gopichand padalkar
Demonetisation : '' सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर; पण मग काळा पैसा कुठे गायब झाला?" राष्ट्रवादीचा सवाल

ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही ते विभाजनाची मागणी करत आहेत. महाविकास आघाडी सरकारनं सत्तेत असताना अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय का घेतला नाही? असा सवालही विखे यांनी उपस्थित केला आहे. तसेच जिल्हा विभाजन हे केवळ ठराविक लोकप्रतिनिधींच्या मनात आहे. मात्र, जिल्हा विभाजन हे भावी पिढीसाठी धोकादायक आहे. आणि ज्यांना राजकीय स्वायत्ता हवीय आणि मनमानी कारभार करता यावा यासाठी अहमदनगरच्या विभाजनाची मागणी करत असल्याचा आरोपही विखे यांनी केला आहे.

Sujay Vikhe, Gopichand padalkar
Pune News : येरवडा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू : कुटूंबियांचा प्रशासनावर गंभीर आरोप

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नामांतराची मागणी केली होती. पडळकर यांनी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करावं असे ते म्हणाले होते. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल असं प्रत्युत्तर दिले होते. तसेच स्थानिक पातळीवरुन महापालिकेकडून तसा प्रस्ताव मागितला असल्याचा देखील केसरकरांनी यावेळी सांगितले होते.

तसेच परभणी जिल्ह्यातील युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी देखील राज्य सरकारला व नगरच्या महापालिकेला पत्र लिहून अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे अशी मागणी केली आहे. मात्र, आता नामांतराच्या मागणीवरुन आमदार पडळकर आणि खासदार विखे एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in