Ahmednagar News : किरण काळे यांच्याकडे काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

Congress News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा
Ahmednagar Congress
Ahmednagar Congress Sarkarnama

Congress News : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे (Congress) नगरचे (Nagar) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे (Balasaheb Salunkhe) यांना काँग्रेसने निलंबित केले. तर आता त्यांच्या पदाचा चार्ज शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रोज एक नवीन ट्विस्ट पहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब साळुंखे यांनी सत्यजीत तांबे यांना समर्थन दिल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Ahmednagar Congress
ST Employee News : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; संपकाळातील कर्मचाऱ्यांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय

आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अहमदनगर (Ahmednagar) दोऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं.

तसेच अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे अहमदनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.

Ahmednagar Congress
Congress News : सत्यजित तांबेंना पाठिंबा देणे पडले महागात : काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद गमावावे लागले

दरम्यान, नाना पटोले (Nana Patole) यांनी आज नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे स्थानिक नेते, राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष किरण काळे यांच्यासह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com