कृषि टर्मिनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार

सय्यद पिंप्री (नाशिक) येथील कृषि टर्मिनलच्या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पहाणी केली.
कृषि टर्मिनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : शहरातील (Nashik) सय्यद पिंप्री येथे उभारण्यात येणाऱ्या कृषि टर्मिनलच्या (Agriculture terminal) माध्यमातून शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळेल, असा दावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.

(Guardian minister Chhagan Bhujbal instruct officers for fast progress)

Chhagan Bhujbal
नुपूर शर्मा किंवा भाजपा म्हणजे भारत नाही!

येथील शंभर एकरवरील नियोजित कृषी टर्मिनल प्रकल्पाच्या जागेची पाहणी पालकमंत्री भुजबळ यांनी केली. त्‍यावेळी त्यांनी या प्रकल्पाला लवकर जमीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

Chhagan Bhujbal
राज्यात राज्यसभेच्या एका जागेसाठी आटापिटा करणाऱ्या भाजपला देशात मोठा फटका!

यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील उत्पादित शेतमालाला देशासह परदेशात मोठी मागणी आहे. हे कृषि टर्मिनल उभारल्याने शेतकऱ्याचा थेट बाजाराशी संपर्क प्रस्थापित करून उत्पादनाच्या विक्रीस पर्याय उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच ओझर विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने दळणवळणाची सुविधाही उपलब्ध असणार आहे. कृषी टर्मिनल मार्केटमुळे शेतमाल आणि फलोत्पादनाच्या विक्रीच्या प्रचलित पद्धतीमुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.

या कृषी टर्मिनल मार्केटमध्ये फळे आणि भाजीपाला, अन्नधान्य, पोल्ट्री, मास, दुग्धजन्य पदार्थांची व उत्पादनाची साठवणुक करता येणार असून या कृषि टर्मिनल मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या अनुषगंगाने आज या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यावेळी आमदार सरोज अहिरे, उपविभागीय अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार अनिल दौंडे, पणन विभागाचे उप महाव्यवस्थापक बहाद्दूर देशमुख, व्यवस्थापक अभियांत्रिकी हेमंत अत्तरदे, सरपंच मधुकर ढिकले आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in