Bachhu Kadu
Bachhu KaduSarkarnama

कायदे मागे घेतले, पण शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या धोरणाचे काय?

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शहीद स्मारक लोकार्पण सोहळा झाला.

निफाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, त्याचे काय?. कच्चे तेल आयात केल नसते तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला असता. पण केंद्राने शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांच्या घरावर तलवार चालविली असा घणाघात राज्य मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केला.

Bachhu Kadu
बिनविरोध नकोच, मते मिळवून जिंकण्यातील आनंद बिनविरोध निवडणुकीत नाही!

निफाड येथील शहीद स्मारक लोकार्पण तसेच दिव्यांग शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यावेळी उपस्थित होते. प्रारंभी निफाड येथील अर्बन बँकेपासून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रॅली काढण्यात आली.

चालू वीजबिल भरण्याची सवलत द्या

आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना सेवेचा विसर पडू देऊ नका असे सांगताना नेत्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे होर्डिंग लावण्याऐवजी गरिबांच्या झोपडीवर छत टाकणे जास्त चांगले राहील. आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झालेली असून थकीत वीज बिल भरण्याची ताकद त्याच्यात उरलेली नाही, त्यामुळे आजच्या घडीला शेतकऱ्यांना फक्त चालू बिल भरण्याची सवलत मिळावी. उद्योगपतींच्या हितासाठी सरकारने तेल आयातीचा निर्णय घेतला परंतु त्याचा फटका सोयाबीनचे भाव प्रचंड कोसळण्यात झाला.

Bachhu Kadu
बच्चू कडू संतापले, `अरे, तुम्ही तर मंत्री जयंत पाटील यांच्या पत्रालाही दाद देत नाही`

शहीद कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. मंत्री कडू म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, त्यांच्या हौतात्म्यातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभले, ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, पोलिस निरीक्षक रंगाराव सानप, गटविकास अधिकारी संदीप कराड, सभापती, उपसभापती, सदस्य तसेच शिवाजीराव ढवळे, सागर निकाळे, अनिल कुंदे, शिवाजी ढेपले, विक्रम रंधवे, सोनाली चारोस्कर, सपना बागूल, शिवा सुराशे, सोमनाथ पानगव्हाणे, पंडित आहेर, विकास रायते आदींसह मान्यवर उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com