जेव्हा कृषीमंत्री भुसे अनुदान रोखणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात धरणे धरतात!

मालेगाव तहसिलदारांच्या दालनात प्रलंबित अनुदानाच्या मागणीसाठी ठिय्या मांडून बसलेले कृषिमंत्री दादा भुसे व शिवसेना कार्यकर्ते.
Agreeculture Minister Dada Bhuse With Farmers
Agreeculture Minister Dada Bhuse With FarmersSarkarnama

मालेगाव : राज्य शासनाचे (State Government) अतिवृष्टी अनुदान व संजय गांधी निरोधार योजनेच्या लाभार्थींचे अनुदान (Funds) प्राप्त होऊनही ते वेळेत वाटप न करता शासन व लोकप्रतिनिधींची बदनामी करण्याचा प्रयत्न करता काय?, असा आरोप करीत कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी येथील महसूल विभागातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

Agreeculture Minister Dada Bhuse With Farmers
महाविकास आघाडीने भाजपकडून किमान एव्हढं शिकावंच!

कृषिमंत्र्यांनी तहसील कार्यालयात समर्थकांसह तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन केले. या दरम्यान जिल्हाधिकारी सूरज मांढरे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्याशी त्यांची शाब्दीक चकमक उडाली.

विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मोबाइलवरुन संपर्क साधत श्री. भुसे यांना आठ दिवसांत प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील ४४ गावांचे शेतकरी वर्षभरापासून अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. संजय गांधी योजनेच्या १ हजार ७०० लाभार्थ्यांना जुलै २०२१ पासून अनुदान मिळालेले नाही. शासनाचा पैसा प्राप्त होऊनही महसूल विभागाने योग्य नियोजन केलेले नाही. आठ दिवसात याप्रश्‍नी कारवाई न झाल्यास पुन्हा येतो, जाब विचारतो असा सज्जड दम श्री. भुसे यांनी दिला. या वेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पत्रकारांना या बैठकीला प्रतिबंध करण्यात आला होता.

Agreeculture Minister Dada Bhuse With Farmers
आमदार सुहास कांदेचा नांदगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का

अतिवृष्टी प्रलंबित अनुदान, लाभार्थी व संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या असंख्य तक्रारी आल्यानंतर श्री. भुसे पक्ष कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना जाब विचारला. कृषी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनाही तहसील कार्यालयात बोलावले. संजय गांधी योजनेच्या लाभार्थींना तत्काळ अनुदान द्यावे व ४४ गावातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा निर्णय आठ दिवसात मार्गी लावावा, अशी सूचना देतानाच त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या वेळी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. श्री. शर्मा यांच्या भ्रमणध्वनीवरुन श्री. भुसे यांनी जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यात शाब्दीक चकमक होत असताना भ्रमणध्वनी रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी शर्मा यांनाही चार शब्द सुनावले.

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, रामा मिस्तरी, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, प्रमोद पाटील, भिकन शेळके, राजेश अलीझाड, भिमा भडांगे आदींसह शेकडो कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.

मालेगाव तालुक्याला मिळालेले ८९ कोटी रुपये अनुदान वाटप झाले. त्याची चौकशीदेखील झाली. यातील पाच लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिरिक्त गेले. उर्वरित ४४ गावांचे पंचनामे झाले आहेत. अनुदानाची प्रतीक्षा आहे. हे काम सुरु असल्याने अनुदान खात्यावर वर्ग केले नाही.

- चंद्रजीत राजपूत, तहसीलदार, मालेगाव

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com