भाजपने `अग्निपथ`द्वारे युवकांची स्वप्ने भस्म केली.

`अग्निपथ` योजनेच्या विरोधात मालेगाव शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा.
भाजपने `अग्निपथ`द्वारे युवकांची स्वप्ने भस्म केली.
NCP agitation At Malegaon, Agnipath Protest News UpdatesSarkarnama

मालेगाव : कोरोना (Covid19) संसर्गामुळे मागील दोन वर्षे देशाच्या तिन्ही दलातील संरक्षण क्षेत्रात भरतीप्रक्रिया झालेली नाही. या भरतीसाठी देशातील लाखो युवक तयारी करीत असताना अचानक अग्निपथ (Agneepath) या योजनेची घोषणा झाली. या योजनेमुळे लाखो बेरोजगार तरुणांत नैराश्य आहे. त्यामुळे ही योजना रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (NCP) देण्यात आला. (NCP agitaion at malegaon against Agneepth employment scheme)

NCP agitation At Malegaon, Agnipath Protest News Updates
आमदार कुणाल पाटील यांचा भाजपला `जोर का झटका`

सैन्यात निवड झालेल्या सैनिकास फक्त चार वर्षांसाठी निवड व सेवा करण्याची संधी असेल. चार वर्षांच्या कालावधीनंतर विशिष्ट रक्कम देऊन त्याचा सेवा कालावधी समाप्त होणार आहे. अग्निपथ योजनेविरोधातील उत्तरेकडील राज्यांची धग महाराष्ट्रातही पोहोचली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने या योजनेला विरोध केला आहे. अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांमध्ये संताप आहे. (Agnipath Protest News Updates)

NCP agitation At Malegaon, Agnipath Protest News Updates
एकनाथ खडसेंच्या विजयाने तापी खोऱ्यात ‘दिवाळी’

या योजनेमुळे फक्त चार वर्षांसाठी रोजगार मिळेल. भविष्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल. चार वर्षांनंतर निवृत्त झालेल्या सैनिकांना पर्यायी रोजगार उपलब्ध न झाल्यास हे प्रशिक्षित सैनिक नागरी युद्ध करण्याची भीती काही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. या योजनेमुळे भारतीय संरक्षण सिद्धतेला बाधा निर्माण होऊ शकतो. ही योजना रद्द करुन पूर्वीप्रमाणे सैन्य भरती करून सैनिकांना १५ वर्षे देशसेवेची संधी द्यावी. अग्निपथ योजना बंद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, व विद्यार्थी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख व युवक प्रदेश सचिव दिनेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन केले. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदारांना निवेदन दिले.

या आंदोलनात शहर जिल्हा युवक कार्याध्यक्ष मनमोहन शेवाळे, शहर कार्याध्यक्ष अनंत भोसले, मालेगाव बाह्य अध्यक्ष विनोद चव्हाण, तालुकाध्यक्ष संदीप पवार, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, विद्यार्थी अध्यक्ष योगेश बागूल, अशोक निकम, अशोक चित्ता, संजीवन वाघ, कल्पेश गायकवाड, हर्षल पवार, सुजल देवरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in