Shivsena News: आक्रमक व्हा, विरोधकांना सडेतोड उत्तर द्या!

Shubhangi Patil: शिवसेनेच्या संपर्कप्रमुख ॲड. शुभांगी पाटील यांनी दिवंगत सत्यभामा गाडेकरांच्या निवासस्थानी भेट देत सुरु केले काम.
Adv. Shubhangi Patil
Adv. Shubhangi PatilSarkarnama

Nashik News:महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे. शिवसेना (Shivsena) मराठी माणसांची प्रतिनिधीक संघटना आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महिलांनी (Womens) आक्रमक होऊन शिवसेनेच्या विस्तारावर लक्ष केंद्रीत करावे. त्यासाठी समाज माध्यमांचा (Social Media) कल्पक वापर करून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख ॲड. शुभांगी पाटील (Adv. Shubhangi Patil) यांनी केले.(Shivsena is only the party of maharashtra & Marathi people)

शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी ॲड. शुभांगी पाटील यांची नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर त्यांनी बुधवारी दिवंगत महिला आघाडी संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत कामकाज सुरू केले.

Adv. Shubhangi Patil
Shivsena News; गद्दारांनो, शाखांना हात लावाल तर फडशा पाडू!

ॲड. पाटील यांनी शिवसेनेच्या कार्यालयात महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेला आगामी काळात अधिक आक्रमक होऊन काम करावे लागेल. त्यात महिलांचा वाटा व सहभागी दोन्हींना महत्त्व आहे. खुप कष्ट घेण्यापेक्षा कल्पकतेने काम करण्यावर भर दिला पाहिजे. समाजाचे, कार्यकर्त्यांची प्रश्न नेमकेपणाने समजून घ्यावे. त्यावर काम करावे. विरोधकांना त्यांच्यापेक्षाही अधिक आक्रमकपणे उत्तर द्यावे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा.

नुकत्याच झालेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना व महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी केलेल्या व राज्यभर चर्चेत राहिलेल्या ॲड. पाटील यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्र (धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नगर) महिला संपर्कप्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर त्यांनी नाशिकला दिवंगत शिवसेना नेत्या व उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी काम केलेल्या स्व. सत्यभामा गाडेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

Adv. Shubhangi Patil
Sanjay Raut News; बाळासाहेब ठाकरेंनी गद्दारांना कधी आशीर्वाद दिले आहेत का?

या पदावर कामाला सुरवात करण्यापूर्वी ताईंचा आशीर्वाद घेऊन शिवसेना व महिला आघाडीचे काम जोमाने करून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहे, असा संदेश दिला. योगेश गाडेकर, जयश्री गाडेकर, पल्लवी गाडेकर, चैताली गाडेकर, स्वाती गाडेकर, कल्पना गाडेकर, योगिता गाडेकर यांनी त्यांचे स्वागत व औक्षण केले. कामगार नेते जयंत गाडेकर, लक्ष्मण गाडेकर, मंदा गवळी, योगेश देशमुख, मसूद जिलानी, स्वप्नील औटे, अमित भगत, स्वप्नील शहाणे, प्रवीण वाजे, संदीप आहेर, दीपक काळे, हेमंत रौदाळे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com