Nilesh Lanke : नीलेश लंकेंची पुन्हा चर्चा, तालुक्यात नवा उपक्रम; विद्यार्थ्यांना वाटल्या तब्बल सात हजार सायकल

Ahmednagar : आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त नवा उपक्रम
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

Parner : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके हे त्यांच्या कामामुळे नेहमी चर्चेत असतात. आता देखील त्यांनी वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यात नवा उपक्रम केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तब्बल सात हजार सायकल वाटप केल्या आहेत.

लंके यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.10 मार्च ) पारनेरमध्ये खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवारांसह राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते. यावेळी पवारांच्या हस्ते पारनेर मतदार संघातील विविध विकास कामांचेही उद्घाटन झाले.

Nilesh Lanke
Satara : शिवसेनेची मोर्चे बांधणी ; उद्या राजेश क्षीरसागर साताऱ्यात..

पारनेर मतदार संघातील दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पायी चालत जावं लागतं. त्यामुळे लंकेंनी वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना ७ हजार सायकलचे मोफत वाटप केले.

यावेळी पवार म्हणाले, ''नीलेश लंके यांनी पारनेर-नगर मतदारसंघाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून पारनेर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे.

कोरोना काळात हजारो लोकांना जीवनदान देऊन अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय उपक्रम राबवत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. संघर्षशील पारनेरला लंके यांच्या रूपाने सुवर्ण माणूस लाभला आहे'', अशा शब्दात पवारांनी लंकेंच्या कामाचे कौतुक केले.

Nilesh Lanke
Patole News : सोमय्यांकडे ईडीची कागदपत्रं कशी पोहोचतात? कॉंग्रेस आक्रमक, सोमवारी राज भवनावर धडकणार !

हार-तुरे नको, शालेय साहित्य द्या...

आपल्या वाढदिवसानिमित्त कुणीही हार तुरे, फेटा, शाल अशा वस्तू आणू नये, तसेच भेट द्यायची असेल तर शालेय साहित्य आणावे, त्याचा स्विकार केला जाईल. या शालेय साहित्याचे गोरगरीब विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल, असं आवाहन लंकेंनी केलं होतं.

Nilesh Lanke
Gondia News : कर्नाटकनंतर मध्यप्रदेश सीमेवरही पेटला सीमाप्रश्‍न, एमपीत जाण्यासाठी आठ गावे आक्रमक !

दरम्यान, या आधीही कोरोना काळात नीलेश लंकेंनी केलेल्या रुग्णसेवेचे राज्यभर कौतुक झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी लंकेंनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५१ सर्वधर्मीय जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. आता आणखी एक नवा उपक्रम करत तब्बल सात हजार सायकल विद्यार्थ्यांना मोफत वाटल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com