Rohit Pawar on Ajit Pawar Group : पडळकरांच्या टीकेनंतर अजितदादांना नेते मानणारे मोठे नेते गप्प का ? रोहित पवारांना संशय

Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.
Rohit Pawar and Ajit Pawar Group
Rohit Pawar and Ajit Pawar GroupSarkarnama

Ahmednagar News: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील कार्यकर्ते ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करत आहेत. मात्र, अजितदादांबरोबर गेलेल्या मोठ्या आणि मंत्रिपदावर असलेल्या नेत्यांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया न आल्याने यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे.

"भाजपमधील काही भौतिक क्षमता नसलेले नेते खालच्या पातळीवर नेहमी टीका करतात. अजितदादा आता सरकारमध्ये असतानाही त्यांच्यावर काही चॉकलेट नेते खालच्या पातळीवर वक्तव्य करत आहेत. मात्र, त्यानंतरही अजितदादांना नेते मानणारे आणि त्यांच्याबद्दल मोठमोठी भाषणे करणारे इतर मोठे नेते शांत असल्याबद्दल आश्चर्य वाटतं", अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar and Ajit Pawar Group
Shivajirao Adhalrao Patil : सत्तेत असूनही आढळराव पाटलांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' रखडला; कोण घालतंय खोडा ?

भाजपमधील काही नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत असतात. पण आता अजितदादा हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्यासोबत असतानाही त्यांच्यावर होणाऱ्या टिकेबद्दल रोहित पवारांनी आश्चर्य व्यक्त केले.

दरम्यान, पडळकर यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्पष्ट शब्दात कान टोचले आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही पडळकरांचा समाचार घेतला.

अजितदादांनी आता आपण वाघ असल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हान वडेट्टीवारांनी दिले. मात्र, खुद्द ज्यांच्यावर टीका झाली त्या अजित पवार गटातील मोठ्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली नसल्याने आता चर्चा सुरू झाली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Rohit Pawar and Ajit Pawar Group
Nana Kate On Padalkar : पडळकरांच्या पवारांवरील टीकेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये संताप; नाना काटेंनी दिला काळे फासण्याचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in