Ahmednagar : नगर जिल्हा बँकेतील पराभवानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

NCP : राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे पदाधिकारी आक्रमक
Ahmednagar NCP
Ahmednagar NCP Sarkarnama

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच (दि.८ मार्चला) पार पडली. या निवडणुकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपचे सहा संचालक आहेत. तर महाविकास आघाडीचे १४ संचालक आहेत. मात्र, पुरेसे संख्याबळ असताना देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अॅक्शन मोडवर आले आहेत.

Ahmednagar NCP
Ahmednagar : नगर जिल्हा बँकेतील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी; फुटीर संचालकावर कारवाई होणार?

राष्ट्रवादीच्या संचालकांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संख्याबळ असतानाही पराभव कसा झाला? या बाबींची चौकशी करण्यात येणार असून अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.

मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Ahmednagar NCP
Ahmednagar Politics : नगरच्या राजकारणात 'पिसाळ पॅटर्न'ची चर्चा; काय आहे हा पॅटर्न?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व संजय कोळगे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि जिल्हा सहकारी बँकेतील फुटीर संचालकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राजकीय घडामोडी घडल्या होत्या. या घडामोडी जिल्हाध्यक्ष फाळके यांना माहिती असायला हव्या होत्या.

त्यांनी या घडामोडीची माहिती वरिष्ठ नेत्यांना द्यायला हवी होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Ahmednagar NCP
Ahmednagar : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड होताच कर्डिलेंनी सांगितलं विजयाचं गणित

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आता पक्षातील वरिष्ठ यावर काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com