अखेर नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झालाच!

शहरातील दहा वर्षिय बालक बाधित, मात्र गंभीर लक्षणे नाहीत
Amicron  In Nashik City

Amicron  In Nashik City

Sarkarnama

नाशिक : ओमिक्रॉन व्‍हेरिएंटपासून (Omicron) जिल्‍हा अद्यापपर्यंत बचावलेला होता. परंतु, जनॉम सिक्‍वेंसिंगमध्ये एका रुग्‍णाच्‍या नमुन्‍यांमध्ये गुरुवारी ओमिक्रॉन व्‍हेरिएंट आढळला. त्यामुळे अखेर नाशिक (Nashik) जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे.

<div class="paragraphs"><p>Amicron&nbsp; In Nashik City</p></div>
अहो मुनगंटीवार, सरकार बरखास्ती म्हणजे कठपुतळीचा खेळ आहे का?

दरम्यान, संबंधित रुग्‍ण नाशिक शहरातील असून, त्‍याच्‍यात कुठल्‍याही गंभीर स्‍वरुपाची लक्षणे आढळली नसल्‍याचे जिल्‍हा प्रशासनाने स्‍पष्ट केले. संबंधीत रूग्ण हा दहा वर्षीय कोरोना बाधित बालक असून, त्याच्या पालकांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्‍यातच या बालकाचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. आता त्‍याच्या नमून्‍यात ओमिक्रॉन व्‍हेरीएंट आढळून आला आहे. या बालकाची किंवा त्‍याच्‍या कुटुंबियांची कुठल्‍याही स्‍वरुपातील ‘फॉरेन हिस्ट्री’ नाही. अर्थात्‌ त्यांच्‍यापैकी कुणीही अलीकडील काळात परदेश दौरा केलेला नाही. बाधित कुटुंब हे गंगापूर रोड परिसरातील रहिवासी आहे.

<div class="paragraphs"><p>Amicron&nbsp; In Nashik City</p></div>
संभाजीराजे म्हणाले, `फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, ते पंतप्रधान होतील`

ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. युरोपीय देशांमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ नोंदविली जात आहे. देशातही अनेक राज्‍यांत ओमिक्रॉन बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही दिवसांत महाराष्ट्रातही ओमिक्रॉन व्‍हेरिएंट असलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, नाशिक जिल्‍हा आत्तापर्यंत यापासून बचावला होता. अखेर गुरुवारी ओमिक्रॉन व्‍हरिएंटने जिल्ह्यात शिरकाव केला आहे. जिनॉम सिक्‍वेंन्‍सकरीता पाठविलेल्‍या संबंधीत बालकाच्या नमून्‍यात ओमिक्रॉन व्‍हेरीएंट आढळून आला आहे. दरम्‍यान, संबंधित रुग्‍णात कुठल्‍याही स्‍वरुपाची लक्षणे नसल्‍याचे जिल्‍हा प्रशासनाने स्‍पष्ट केले आहे.

दरम्‍यान, नाशिकमध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्‍हेरीएंट आढळून आल्‍यानंतर जिल्‍हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनाने जारी केल्‍या आहेत. जिनोम सिक्‍वेंसिंगसाठी पाठविल्या जाणाऱ्या नमून्‍यांत वाढ केली जाण्याची शक्‍यता आहे.

---

नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. परंतु, या व्‍हेरीएंटच्‍या प्रसाराची गती विचारात घेता नियमांचे काटेकोर पालन आवश्‍यक झाले आहे. लसीकरणाला प्राधान्‍य द्यावे.

- सूरज मांढरे, जिल्‍हाधिकारी.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com