शेतकऱ्यांना १५ दिवसात मदत मिळेल!

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिक येथे शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama

सातपूर : यंदा अवकाळी पाऊस, (Heavy Rainfall) गारपीट, चक्रीवादळ ढगफुटी (Cloud burst) यासारख्या अनेक संकटांनी शेतकरी (Farmers) हवालदिल झाला असून कोणताही शेतकरी नुकसान भरपाई (compensation) पासून वंचित राहणार नाही, तसेच पीक विमाचे पैसे सर्वांना मिळतील यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdull Sattar) यांनी दिले. (Maharashtra Government is bonded to give compensation for farmers)

Abdul Sattar
माणिकराव कोकाटे निवडणुकीसाठी गोरगरीबांची दिशाभूल करीत आहेत

राज्यातील शेतकरी अनेक संकटावर मात करीत वाटचाल करीत असताना राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यात येत आहे. येथील कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे, राज्यातील कृषी क्षेत्रात कार्यरत अन्य संस्थांनी याचा आदर्श घ्यावा, असेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

Abdul Sattar
धक्कादायक; अवैध धंद्यांत ‘पोलिसांची’ पार्टनरशीप?

ते म्हणाले की, यंदा विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांसाठी सुमारे १२ हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मदतीचे वाटप करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसात सर्व मदतीचे वाटप करण्यात येईल.

शेतकऱ्याची सत्तारांना चिठ्ठी

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना कार्यक्रमातच जळगाव जिल्ह्यातील बाबाजी सोनवणे (वय ६५) या शेतकऱ्याने परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या कापूससह इतर पिकांची नुकसान भरपाई कधी मिळणार अशी चिठ्ठी लिहून विचारणा केली यावेळी सत्तारांनीही परतीच्या पावसाने नुकसान भरपाई येत्या महिन्याभरात खात्यात जमा होईल, असे आश्‍वासन देत आपलं सरकार हे लोकल गाडी सारखं आहे, हात दाखवा व गाडी थांबवा सर्वांना बरोबर घेऊन जाणार सरकार आहे, असे आपल्या खास शैलीत या चिठ्ठीला उत्तर दिलं.

यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, आयोजक साहिल न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे, नाडाचे सचिव लक्ष्मीकांत जगताप, नाडाचे खजिनदार मंगेश तांबट, कृषी विभागाचे सहसंचालक मोहन वाघ, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे, चंद्रकांत ठक्कर, प्रभाकर पाटील, बापूराव पाटील, महेश हिरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com