Malegaon News; ज्यांना मोठे केले ते पळाले...शिवसैनिक शिवसेनेसोबतच!

ऐतिहासिक महात्मा गांधी मैदानावर उसळला निष्ठावंत शिवसैनिकांचा जनसागर.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

मालेगाव : (Malegaon) गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना (Shivsena) गटाच्या सभेला आज ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. बंदरे विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या घरातच थेट शक्तीप्रदर्शन करीत त्यांना आव्हान दिले. उत्तम नियोजनाचा प्रत्यय त्यात दिसून आला. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला. (Shivsena followers big crowed given straight massage to Dada Bhuse)

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray In Malegaon : उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावमध्ये धडाडणार : कुणाकुणाचा घेणार समाचार?

यावेळी नेत्यांनी केलेल्या भाषणात वारंवार गद्दार, गद्दार या शब्दाचा प्रयोग करीत होते. यावेळी शुभांगी पाटील म्हणाल्या, ज्यांना मोठे केले ते गद्दार झालेत. मात्र खरे शिवसैनिक आहे तीथेच शिवसेनेत निष्ठेने राहिले आहेत. जे चाळीस आमदार गद्दारी करून गेले, त्यांना येत्या निवडणुकीत त्यांची जााग दाखवून देऊ. त्यांचा पारभव करून सर्व जागांवर शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार निवडून येतील, यात शंका नाही.

Uddhav Thackeray
Malegaon News; संजय राऊत मालेगावला, दादा भुसे काही दिसेना!

उद्धव ठाकरे यांच्या सभेला आज मालेगाव येथे झालेल्या सभेला झालेल्या गर्दीतून एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी या सभेचा आवाज मातोश्री आणि मुंबईपर्यंत जाईल यात शंका नाही. अन्याय, गद्दारी व बंडाळीला हे उत्तर आहे, असा दावा केला. यापुढे गद्दारांना थारा मिळणार नाही. त्यामुळे पुढचे आमदार अद्वय हिरे असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मैदानाचे महत्त्व

शहरातील महात्मा गांधी विद्यामंदीराच्या विस्तीर्ण मैदानावर ही सभा झाली. यावेळी सभेला मोठी गर्दी केली होती. कर्मवीर भाऊसाहबे हिरे यांनी 1945 मध्ये संस्थेची स्थापना केली होती. त्यानंतर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत संस्थेचा प्रारंभ झाला होता. 1952 मध्ये पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. आयोजक अद्वय हिरे भाऊसाहेब हिरे यांचे पणतु आहेत.

Uddhav Thackeray
Rahul Gandhi News : भुजबळ यांनी भाजपच्या `ओबीसी` आंदोलनाची हवाच काढली

शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, रवींद्र मिर्लेकर, उपनेते सुनिल बागूल, उपनेते, माजी मंत्री बबनराव घोलप, धुळे जिल्हाप्रमुख, माजी आमदार संभाजी पवार, नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेते विलास शिंदे, शरद पाटील, आमदार आमशा पाडवी, प्रकाश भातरपेकर, आमदार बोरणारे, नरेंद्र दराडे, पवन ठाकरे, उपनेते आणि सभेचे आयोजक अद्वय हिरे, जिल्हा प्रमुख जयंत दिंडे, गणेश धात्रक, शुभांगी पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com