Dada Bhuse News; शिवजयंती सजावटीवरून दादा भुसे आणि अद्वय हिरे वाद पेटला

अद्वय हिरे यांच्या उपस्थितीत मालेगाव शहरात शिवतिर्थावर एकता मंडळाच्या समर्थनार्थ सर्व पक्षीय निषेध आंदोलन.
Dada Bhuse & Adway Hire
Dada Bhuse & Adway HireSarkarnama

मालेगाव : (Malegaon) शिवजयंतीनिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवतिर्थावर सुशोभीकरणाचे काम एकता मंडळ आजपर्यंत करत आले आहे. येथील महापालिका प्रशासन पालकमंत्र्यांच्या (Dada Bhuse) दबावाखाली काम करीत आहे. तालुक्यातील सर्व प्रशासकीय खात्यात पालकमंत्री पदाचा गैरवापर करीत आहेत. पालकमंत्र्यांच्या दबावात काम करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेला (Shivsena) परवानगी दिली. (All party agitation against Minister Dada Bhuse)

Dada Bhuse & Adway Hire
Trible News; विजयकुमार गावित धावले विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या मदतीला

महापालिकेने स्वत:च्या पैशातून सुशोभीकरण करायला हवे होते. सुशोभीकरणाच्या कारणावरुन पालकमंत्रीच राजकारण करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे युवानेते अद्वय हिरे यांनी येथे केला.

Dada Bhuse & Adway Hire
Nashik News; नाशिकच्या ‘या‘ प्रकल्पाला आज दिल्लीची मंजुरी?

श्री. हिरे म्हणाले, की एकता मंडळाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करून पाठिंबा दिला. छत्रपती शिवरायांचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. पालकमंत्री यांना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यातील पोलिस देखील पालकमंत्र्यांच्या मर्जीप्रमाणे काम करीत आहेत. पोलिसांचे हे वागणे बरोबर नाही. मनपा आयुक्त देखील गैरव्यवहाराने बरबटले आहेत.

श्री. गायकवाड म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणासाठी महापालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. पालकमंत्र्यांच्या दबावात त्यांच्या पक्षाला परवानगी देण्यात आली. महापालिका अधिकारी दबावात काम करीत आहेत. पालकमंत्री यांच्या पक्षाला दिलेली परवानगी रद्द करावी. अन्यथा न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

येथील शिवतिर्थावर एकता मंडळाच्या समर्थनार्थ सर्व पक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी गुलाब पगारे, जितेंद्र देसले, रामा मिस्तरी, रामदास बोरसे, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप नेते सुनील गायकवाड, बाराबुलतेदार मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव, भाजपचे देवा पाटील, लकी खैरनार, लकी जगताप, नथु देसले, रामा मिस्तरी आदींसह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com