Advay Hiray Joins Thackeray Group : नाशिकमध्ये ठाकरेंकडून 'अद्वय' डाव; दादा भुसेंना कडवे आव्हान !

Advay Hiray : मालेगावचे अव्दय हिरे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित करणार शिवसेनेत प्रवेश
Advay Hiray, Uddhav Thackrey
Advay Hiray, Uddhav ThackreySarkarnama

Nashik News : राज्यातील सत्तांतरानंतर विविध पक्षांतून शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार इमकमिंग सुरु आहे. नाशिकमध्ये मात्र वेगळे चित्र दिसून येत आहे. नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील भाजपचे नेते डॉ. अद्वय हिरे (Dr. Advay Hiray) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार आज मालेगावहून अद्वय हिरे कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यामुळे नाशिकचे पालकमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांना त्यांच्याच मालेगाव (Malegoan) मतदारसंघात आता आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advay Hiray, Uddhav Thackrey
Pariksha pe charcha 2023 : विद्यार्थ्यांसोबत मोदी गुरुजींचे पालकांनाही कानमंत्र; 'तुमच्या आतली ताकदच... पहा फोटो

सेना भवनात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते हिरे हातात शिवबंधन बांधणार आहेत. आता ते कार्यकर्त्यांसह मालेगावहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान हिरे यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी (२२ जानेवारी) उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार हिरे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Advay Hiray, Uddhav Thackrey
Mohsin Shaikh Case : मोहसीन शेख हत्या प्रकरण : धनंजय देसाईसह 20 जणांची निर्दोष मुक्तता

अद्वय हिरे यांच्यामुळे मालेगावमध्ये भाजपला मोठी ताकद मिळाली होती. पण पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे कट्टर विरोधक म्हणूनही हिरे यांच्याकडे पाहिले जाते. जून २०२२मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि महाआघाडी सरकार कोसळले. त्यामुळे तालुक्यातील भाजप आणि मूळ सेनेतील दुरावा संपला, पण हे राजकीय समीकरण भाजपसाठी हिताचे नसल्याचेही त्यांनी वेळोवेळी वरिष्ठांना सांगितले होते.

Advay Hiray, Uddhav Thackrey
Ajit Pawar vs Ashish Shelar : फडणवीसांच्या 'त्या'आरोपावरून आशिष शेलार-अजित पवारांमध्ये जुंपली

भुसे यांची हकालपट्टी करण्यासाठी डॉ. हिरे यांनी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पत्रही लिहले होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आणि देवेंद्र (Devendra Fadanvis) फडणवीस यांनी त्यांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले होते. त्यातूनच त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. हिरे आता ठाकरे छावणीत गेल्याने, महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी मालेगाव (Malegaon) आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Advay Hiray, Uddhav Thackrey
Pimpri Chinchwad News : पिंपरीत 'ईडी'ची एन्ट्री : सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांच्या घरावर छापा, चर्चांना उधाण!

डॉ. हिरे यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत दादा भुसे (Dada Bhuse) विरुद्ध हिरे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

डॉ.अद्वय हिरे (Advay Hiray) माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र आहेत. ते २००९ पासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी कार्यकर्ता म्हणून भाजपने केलेल्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. डॉ.हिरे हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे ते चेअरमन पदावर कार्यरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com