Smt. Nilimatai Pawar
Smt. Nilimatai PawarSarkarnama

MVP News: नितीन ठाकरे यांनी शरद पवारांची दिशाभूल केली!

श्रीमती नीलिमाताई पवार म्हणाल्या, नवे सरचिटणीस नितीन ठाकरे यांचा अभ्यास कमी आहे.

नाशिक : मविप्र (Maratha) संस्था सक्षम व भक्कम आहे. संस्थेने (MVP) विकासकामांसाठी घेतलेले कर्ज व देणी ९६ कोटी तर ठेवी, बँक शिलल्क १५२ कोटी आहे. मग संस्था अडचणीत कशी?. मात्र नवनिर्वाचीत सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे (Adv. Nitin Thackray) यांनी महाराष्ट्राचे व आमचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना चुकीची माहिती देऊन संस्था अडचणीत असल्याचे सांगितले, असा पलटवार संस्थेच्या मावळत्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार (Smt. Nilimatai Pawar) यांनी केला आहे. (MVP institute is financialy strong, no crisis at all)

Smt. Nilimatai Pawar
राणे कुटुंबियांच्या गाडीचा अपघात...

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नवनिर्वाचीत पदाधिकारी व अॅड ठाकरे दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटले. यावेळी त्यांनी संस्थेवर मोठे दायित्व असल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याचे सांगितले होते. त्याचा समाचार श्रीमती पवार यांनी घेतला.

Smt. Nilimatai Pawar
Shahaji Patil : शिंदे -फडणवीस सरकार कार्यकाल पूर्ण करणार...

याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, अॅड. ठाकरे अफवा पसरवून निवडणूक जिंकले. आता निवडणूक संपली तरी अफवा पसरवतच आहेत. त्यांनी आल्या आल्या महाराष्ट्रभर संस्थेची बदनामी केली आहे. हा मविप्र समाजाच्या सभासदांचा अपमान आहे. त्यांचा अभ्यास नाही. त्यांनी आधी अभ्यास करावा. काही मदत लागली तर सांगावे आम्ही देखील त्यांना मदत करू. मात्र सत्तेत आला आहात, तर नीट कारभार करावा, मविप्रच्या बदनामीचे काम आता थांबवावे. आमच्या कार्यकारीणीने अत्यंत काटकसरीने व दुरदृष्टीने काम करून संस्थेला प्रगतीपथावर नेले आहे.

त्या म्हणाल्या, शरद पवार यांना त्यांनी चुकीची माहिती दिली. तेव्हा नवनिर्वाचीत अध्यक्ष डॅा. सुनिल ढिकले यांनी त्यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या ऑडीटरने देखील त्यांना माहिती दिली होती. मात्र त्यांनी पवार साहेबांना चुकीची माहिती दिली.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांकडून संस्‍थेची बदनामी सुरू आहे. संस्‍थेचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्‍या भेटीदरम्‍यान देयकांबाबत चुकीची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. संस्‍था आर्थिकदृष्या मजबूत आहे. ९७ कोटींची देयके असून, संस्‍थेच्‍या प्रगतिपथावरील कामे पूर्ण करण्यासाठी ४९ कोटी इतका खर्च अपेक्षित असल्‍याचे सांगतांना त्‍यांनी देयकाबाबतचे मुद्दे खोडून काढले.

श्रीमती पवार म्‍हणाल्‍या, की निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल मान्‍य असून, भावी वाटचालीसाठी आम्‍ही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्‍छा देतो. परंतु पदाधिकाऱ्यांकडून संस्‍थेची राज्‍यभर सुरू असलेली बदनामी तातडीने थांबायला हवी. संस्‍थेचा आर्थिक गोषवारा चुकीच्‍या पद्धतीने मांडला जातो आहे. यामाध्यमातून ज्‍येष्ठ नेते श्री. पवार यांच्‍यासह संस्‍थेच्‍या सभासदांची दिशाभूल सुरू आहे. सभासदांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन त्‍यांनी केले. ३१ मार्च २०२२ अखेरच्‍या आर्थिक अहवालानुसार तसेच सध्याची संस्‍थेची आर्थिक स्‍थिती पाहता दिशाभूल सुरू असल्‍याचे स्‍पष्ट होईल.

अध्यक्ष डॉ. ढिकले म्‍हणाले, की ज्‍येष्ठ नेते श्री.पवार यांच्‍यासोबत भेटीत वस्‍तुस्‍थिती मी मांडली आहे. सनदी लेखापालांचा लेखापरीक्षण अहवाल त्‍यांना दाखविताना संपूर्ण माहिती दिली. त्‍यांनीदेखील ही माहिती ऐकून घेतली.

मालमत्ता ६५३ कोटींची

लेखापरीक्षण अहवालाचा (ऑडिट रिपोर्ट) आधार घेत श्रीमती पवार म्‍हणाल्‍या, की संस्‍थेची स्‍थावर मिळकत ५६५ कोटी ९५ लाख व चलमिळकत ८७.१९ कोटी अशी ६५३.१४ कोटींच्या मिळकती आहेत. संस्‍थेची एकूण गुंतवणूक ८१.४५ कोटी असून, ४८.०६ कोटी येणे बाकी (ॲडवान्‍स) आहे. ११६.७२ कोटी इतके एकूण शुल्‍क येणे आहे. संस्‍थेच्‍या बँक खात्‍यात ७२.२५ कोटी शिल्‍लक असून, ८०.३१ कोटींच्या मुदतठेवी आहेत. संस्‍थेवरील कर्ज ५०.१३ कोटी , इतर देणी ४६.९१ कोटी आहेत. संस्‍थेची प्रगतिपथावरील कामे पूर्ण करण्यासाठी येणारा खर्च ४९ कोटी आहे. २०१०-११ ते २०२०-२१ या कालावधीत २९४ कोटी ४३ लाखांची बांधकामे केलेली आहेत.

पत्रकार परिषदेला विद्यमान अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, माजी सभापती माणिकराव बोरस्‍ते, माजी संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, भाऊसाहेब खताळे यांच्‍यासह माजी संचालक, पदाधिकारी उपस्‍थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com