MVP Election: ‘मविप्र’मध्ये ‘परिवर्तन’; अॅड नितीन ठाकरेंचे पॅनल विजयी

सरचिटणीसपदी ॲड. ठाकरेंची बाजी; राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंचा पराभव
Adv. Nitin Thackray
Adv. Nitin ThackraySarkarnama

नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या (MVP) निवडणुकीत तब्‍बल २० वर्षांनंतर संस्‍थेत ‘परिवर्तन’ घडले. सरचिटणीसपदी ‘परिवर्तन’चे उमेदवार ॲड. नितीन ठाकरे (Adv. Nitin Thackray) यांनी नीलिमाताई पवार (Nilimatai Pawar) यांचा पराभव केला. परिवर्तन पॅनलच्‍या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतलेली असताना, अध्यक्षपदाचे उमेदवार आमदार ॲड. माणिकराव कोकाटे (Manirao Kokate) यांना पराभवाचा धक्‍का बसला. प्रगती पॅनलचे डॉ. सुनील ढिकले (Dr. Sunil Dhikle) अध्यक्षपदी विजयी झाले. (Nilimatai Pawar defeated by Nitin Thackray in mvp election)

Adv. Nitin Thackray
MVP Election: `मविप्र` संस्थेच्या निवडणुकीत सभासद काय कौल देतील?

मावळते सभापती माणिकराव बोरस्‍ते यांच्‍यासह संचालक नानासाहेब महाले, उत्तम भालेराव, सचिन पिंगळे, डॉ. जयंत पवार आणि केदा आहेर यांचा दारुण पराभव झाला. जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विश्‍वास मोरे, डी. बी. मोगल, प्रवीण जाधव, डॉ. सयाजी गायकवाड, कृष्णाजी भगत, विजय पगार, संदीप गुळवे आदींचा विजेत्‍यांमध्ये समावेश आहे.

Adv. Nitin Thackray
MVP election: निफाड तालुका ठरणार किंगमेकर?

दोन दशके पवारांचे वर्चस्‍व

(स्‍व.) डॉ. वसंतराव पवार यांनी २००२ मध्ये निवडणूक जिंकत मविप्रचे नेतृत्‍व हाती घेतली. त्‍यानंतर २००७ च्‍या निवडणुकीतही त्‍यांनी यश मिळविले. मात्र त्‍यांच्‍या अकाली निधनानंतर श्रीमती पवार यांच्‍याकडे सरचिटणीसपदाची धुरा समाजाने सोपविली होती. पुढे २०१२ मध्ये त्‍यांनी निवडणूक जिंकत सरचिटणीसपद आपल्‍याकडे कायम राखले. २०१७ च्‍या निवडणुकीतही प्रगती पॅनलने श्रीमती पवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली एकहाती सत्ता मिळविली होती.

संस्‍थेत ॲड. नितीन ठाकरे यांनी सभापती म्‍हणून नेतृत्‍व केले आहे. मागील निवडणुकीत पराभवाचा धक्‍का बसल्‍यापासून त्‍यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ॲड. कोकाटे, बाळासाहेब क्षीरसागर, डी. बी. मोगल, डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्‍यासह इतरांची मोट बांधत अखेर ॲड. ठाकरे यांनी संस्‍थेवर विजयी पताका फडकविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्‍या उमेदवारीवर फुली मारूनही परिवर्तनला फारसा फटका बसला नाही.

उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, अध्यक्षपदाचे प्रगती पॅनलचे उमेदवार डॉ. सुनील ढिकले (४,९३७) विजयी झाले तर परिवर्तन पॅनलचे आमदार माणिकराव कोकाटे (४,६२८) यांना पराभवाचा धक्का बसला. उर्वरीत सर्व जागांवर परिवर्तनचे उमेदवार विजयी झाले. सरचिटणीस- ॲड. नितीन ठाकरे (५,३९६), नीलिमाताई पवार (४,१३५), उपाध्यक्ष- दिलीपराव मोरे (४,४९४) विजयी तर विश्‍वास मोरे (४,९६८), सभापती- बाळासाहेब क्षीरसागर (५,२२५), माणिकराव बोरस्‍ते (४,३४६), उपसभापती- डी. बी. मोगल (५,०४२), डॉ. विलास बच्‍छाव (४,३७१), चिटणीस- दिलीप दळवी (५,१४६), डॉ. प्रशांत पाटील (४,४११). महिला राखीव गटातून परिवर्तन पॅनलच्या दोन्ही महिला विजयी झाल्या.

तालुका संचालकपदी विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, इगतपुरी- संदीप गुळवे (५,२६२), भाऊसाहेब खताळे (४,२६१), कळवण- रवींद्र देवरे (५,१२६), धनंजय पवार (४,४०५), चांदवड- डॉ. सयाजी गायकवाड (५,१३७), उत्तम बाबा भालेराव (४,४४१), दिंडोरी व पेठ- प्रवीण जाधव (५,४८५), सुरेश कळमकर (४,०७२), नाशिक शहर- लक्ष्मण लांडगे (५,०२३), नाना महाले (४,५३१), निफाड- शिवाजी गडाख (५,२५१), दत्ता गडाख (४,२७८), नांदगाव- अमित पाटील (५,०१८), चेतन पाटील (४,५५१), बागलाण- डॉ. प्रसाद सोनवणे (४,९७९), विशाल सोनवणे (४,५३५), मालेगाव- रमेश बच्‍छाव (५,०६६), डॉ. जयंत पवार (४,५२८), येवला- नंदकुमार बनकर (५,२६०), माणिकराव शिंदे (४,३३४), सिन्नर- कृष्णाजी भगत (५,१७९), हेमंत वाजे (४,२६१), देवळा- विजय पगार (४,८८५), केदा आहेर (४,६५२), नाशिक ग्रामीण- रमेश पिंगळे (४,९९५), सचिन पिंगळे (४,६०४).

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com