गुणरत्न सदावर्ते अंदर तर लालपरी निघाली डेपोतून बाहेर!

आजपासून लालपरी आली रूळावर बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाल्याने जळगावला चार हजार फेऱ्या.
MSRTC depo & Gunratna Sadavarte
MSRTC depo & Gunratna SadavarteSarkarnama

जळगाव : लालपरी (MSRTC) आता हळूहळू रूळावर येत आहे. एसटी कर्मचारी संपासाठी (Strike) पुढाकार घेणारे अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunvant sadavarte) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ते सध्या पोलिसांच्या कस्टडीत आहेत. त्यामुळे राज्यभर कर्मचारी कामावर (Employees join duty) हजर होऊ लागले आहेत. जळगावच्या सर्वच आगारातून आतापर्यंत ३ हजार ५१४ कर्मचारी रुजू झाल्‍याने जवळपास सर्वच बसफेऱ्या सुरू झाल्‍या आहेत. (Gunvant sadavarte News Updates)

MSRTC depo & Gunratna Sadavarte
छगन भुजबळांच्या मतदारसंघातील लासलगावला १५ दिवसांतून एकदा पाणी!

राज्‍य परिवहन महामंडळाचे राज्‍य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी जवळपास साडेपाच महिने एसटी कर्मचारी संपावर होते. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची अंतिम तारीख दिली आहे. त्यानुसार अनेक कर्मचारी कामावर रुजू होत असून, जळगाव जिल्ह्यातील आगारात मिळून तब्बल ३ हजार ५१४ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

MSRTC depo & Gunratna Sadavarte
लांबलेल्या निवडणुकांमुळे नेत्यांमध्ये अस्वस्थता!

नंदुरबार डेपोत दोन दिवसात अडीचशेवर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर त्यापूर्वी दिडशे कर्मचारी असे एकूण ५०५ पैकी ४२८ कर्मचारी हजर झाले. त्यामुळे आजपासून लालपरी रूळावर आली असून, दिवसभरात २९४ फेऱ्या नंदुरबार आगारातून एसटीने पूर्ण केल्या आहेत. येत्या दोन दिवसात ग्रामीण भागातील लोकल फेऱ्यांचेही नियोजन होऊन गाव तेथे एसटी पुन्हा पोहोचणार आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलनाला सुरवात केली होती. तेव्‍हापासून सुरू असलेला संप आता हळूहळू मिटू लागला आहे. कामावर रुजू होण्याबाबत वेळोवेळी महामंडळाकडून आवाहन केले. यानंतर जळगाव विभागातील ३ हजार ५१४ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तरीदेखील अद्याप ६७९ कर्मचारी हे संपात सहभागी आहेत.

४ हजाराच्‍या जवळपास फेऱ्या

जळगाव विभागातील जवळपास ८० टक्‍के कर्मचारी हे कामावर रुजू झाले आहेत. यामुळे लांबपल्‍ल्‍यासह स्‍थानिक फेऱ्या देखील वाढल्‍या आहेत. शिवाय अमळनेर व जामनेर आगारातून ग्रामीणच्‍या फेऱ्या देखील सुरू केल्‍या आहेत. यामुळे जळगाव विभागातून दिवसभरात ४ हजाराच्‍यावर फेऱ्या होत आहेत. फेऱ्या वाढल्‍याने विभागाला सोमवारी दिवसभरात ५९ लाख रुपयांचे उत्‍पन्‍न मिळाले.

...

संपात सहभागी असलेल्‍यांपैकी जवळपास ८० टक्‍के कर्मचारी आता कामावर हजर झाले आहे. उर्वरित कर्मचारी देखील रुजू होती. सर्व कर्मचारी हजर झाल्‍यानंतर विभागाचे उत्‍पन्‍न वाढीसाठी विशेष मोहीम राबवू.

- भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com