Jalgaon News: दूध संघावर शासनाच्या प्रशासक मंडळाचाच ताबा

आमदार चव्हाण यांनी आपण पदभार स्विकारला असल्याचा दावा केल्याने खळबळ.
Mangesh Chavan
Mangesh ChavanSarkarnama

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाच्या (Milk Sangh) प्रशासक (Administrator) पदाचा कार्यभार आपण स्विकारला आहे. त्याची प्रशासकीय पुर्तता देखील झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाचा संघावर ताबा आहे. अन्य मंडळी काहीही सांगत असतील तर त्याला काहीही अर्थ नाही, असा दावा शासनाने नियुक्त केलेले प्रशासक आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी सांगितले. (BJP mla is appoined as administrator of milk fedration)

Mangesh Chavan
Jalgaon News: मंदाताई खडसे म्हणाल्या, जिल्हा दूध संघाची चेअरमन मीच!

जिल्हा दूध संघात अध्यक्ष मंदाताई खडसे तसेच अन्य प्रशासक मंडळ यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. याबाबत उच्च न्यायालयात हे प्रकरण गेले आहे.

यासंदर्भात जिल्हा दूध संघात आमदार मंगेश चव्हाण यांनीही पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी प्रशासकीय संचालक अरविंद देशमुख उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, की जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांना ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्य प्रशासक म्हणून मी व दहा संचालकांचा संघावर आज ताबा आहे.

Mangesh Chavan
Nashik News: राज्यपाल ज्या ताटात जेवले त्यातच थुंकले!

ते पुढे म्हणाले, आमची प्रशासक मंडळाची बैठक झाली. आम्ही ५ कोटी ४१ लाखांचे ठराव पास केले. सर्व कामकाज झाले, त्यामुळे ताब्याचा प्रश्‍न येतो कुठे? मंदाताईंनी हे पद वर्षापूर्वीच सोडायला पाहिजे होते. त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस असा आजार असावा काय? असे मला वाटते. वर्षभरात मी राजीनामा देणार, असे त्यांनी वक्त्यव्य केले होते. पाच वर्षांमध्ये पणन संघामध्ये मुदतवाढ देण्याचे अधिकार नव्हते.

आज साडेसहा वर्षे झाली, तुम्ही काय काय उपदव्याप केले, परिवाराच्या बाहेर सत्ता जावू द्यायची नाही, खुर्ची आपल्याकडेच ठेवायची याच भूमिकेतून तुम्ही काम केले आहे. आज आमच्याकडेच सत्ता आहे. मी जबाबदारीने सांगतो, एकनाथ खडसे यांना माझे आव्हान आहे. खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. सर्व बाहेर काढतो. दूध संघ प्रायव्हेट प्रॉपर्टी समजू नये. त्यांना शासनाचा आदेश मान्य नाही. आताही ते न्यायालयाचा आदेश मान्य करीत नाही; परंतु विभागीय उपनिबंधक नाशिक यांचे पत्र असून, त्यांनी प्रशासक मंडळानेच कामकाज बघावे, असे आदेश जारी केले आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in