एकनाथ शिंदेंचा खडसेंना दणका; दूध संघावर प्रशासक मंडळ!

जळगाव जिल्हा दुध संघावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची सत्ता होती
Eknath Khadse, Eknath Shinde
Eknath Khadse, Eknath Shindesarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांचे वर्चस्व व पत्नी मंदाकिनी खडसे चेअरमन असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बरखास्त करुन खडसेंना दणका दिला आहे. दूध संघातील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश देत दूध संघावर मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या नेतृत्वात आकरा जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे.

सन २०१५ मध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. त्यात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पॅनल निवडून आले. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे दूध संघाच्या चेअरमन झाल्या.

Eknath Khadse, Eknath Shinde
शिवसेनेत अखेर फूट पडलीच, मुंबईत पोहोचलेले ते २६ जण शिंदे गटात !

दोनदा मुदतवाढ

दरम्यान, २०२० मध्ये दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपली. मात्र, कोरोनामुळे सर्व प्रकारच्या निवडणुकांवर बंदी असल्याने संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात आली. राज्यातील मविआ सरकारने पुन्हा निवडणूक स्थगित करत संचालक मंडळास दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली. आता सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, त्या निवडणुकांनाही ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती मिळाल्याने मुदतवाढ दिलेले संचालक मंडळच कार्यरत होते.

राज्यात शिवसेनेत बंड होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार अस्तित्वात आले. शिंदे-फडणवीसांच्या या सरकारने मविआ सरकारचे अनेक निर्णय बदलवले, अनेक निर्णय व कामांना स्थगिती दिली. आता जिल्हा दूध संघाचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळच मख्यमंत्र्यांनी सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीचा आधार घेऊन बरखास्त करण्याचे आदेश आज जारी केले.

शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी याबाबतचे आदेश आज काढले. त्यानुसार दूध संघात गत काळात झालेल्या गैरव्यवहारांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार या गैरव्यवहारांची चौकशीही सुरु केल्याचे म्हटले आहे.

प्रशासक मंडळ नियुक्त्या

सहकार कायद्यातील तरतुदीनुसार शासनाने दूध संघावर अकरा जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. त्यात मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण याची तर प्रशासक मंडळात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, भुसावळचे अजय भोळे, पारोळ्यातून अमोल चिमणराव पाटील, जामनेर तालुक्यातून अरविंद देशमुख, चाळीसगाव तालुक्यातून राजेंद्र राठोड, माजी जि. प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, धरणगावचे गजानन पाटील, पाचोऱ्याचे अमोल शिंदे, भडगावचे विकास पाटील यांचा समावेश आहे.

Eknath Khadse, Eknath Shinde
...तर आम्हीही मागेपुढे पाहणार नाही; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा

या बाबत एकनाथ खडसे 'सरकारनामा'शी बोलतना म्हणाले, दोन महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत. निवडणुकांना सामोरे जाण्याची यांची हिंमत नाही. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या वेळी पाहिले आहे. निवडणुकांना सामोरे जा. अडमार्गानी कशासाठी सत्ता घेता, असा सवाल खडसे यांनी केला. प्रशासक मंडळ नेमले, चौकशी समिती नेमली. दुध संध आम्ही नफ्यामध्ये आणला. गिरीश महाजन यांचे ऐकून हा निर्णय घेतला असल्याचा आरोप खडसे यांनी केला. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आज दुध संघ भरभराटीला आला आहे, असेही खडसे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in