धरणातील विसर्गाबाबत प्रशासनाने अलर्ट रहावे

छगन भूजबळ यांनी पूरस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : जिल्ह्यातील (Nashik) पूरस्थितीबाबत लक्ष घालावे तसेच धरणातील विसर्गाबाबत गावांच्या संपर्कात रहा अशा सूचना आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केल्या. जिल्हाधिकारी गंगाथरण डी., (Gangatharan D.) पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) आदी उपस्थित होते. (heavy rain is still on in Nashik, Flood in Nashik)

Chhagan Bhujbal
एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून भाजपने बाजार समित्यांची विधानसभा केली!

श्री भुजबळ यांनी आज गोदावरी काठच्या भागाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थितीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पगार, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते. श्री भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देत, पूरस्थितीबाबत चर्चा केली.

Chhagan Bhujbal
सत्तांतरानंतरही नाशिकमध्ये भुजबळांचेच ग्लॅमर अन् रुबाब!

धरणातील विसर्ग सोडताना पाणी हळूहळू सोडावे. पूरस्थितीने नदीकाठच्या भागात चिखल साचला आहे. नदी काठी अनेक ठिकाणी बेसमेंटमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे दुकानासह घर बंद ठेवावी लागत आहे. महापालिकेच्या संपर्कात राहून गाळ काढण्याला गती द्यावी. विर्सगाचे पाणी एकदम न सोडता टप्प्याटप्प्याने सोडावे. पाणी सोडण्यापूर्वी संबंधित गावांशी संपर्क ठेवावा. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यालगतच्या १६ गाव पाणी पुरवठा योजनेतून संबंधितांना पाणी मिळावे यासाठी एक गेट बंद ठेवावे, आदी मागण्या केल्या.

२० वाड्यांचा प्रश्न

शहरात गोदावरी काठी संततधारेनंतर साधारण २० वाडे खचले आहे. जुन्या वाड्यामुळे लगतच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे महापालिकेशी संपर्क ठेवून संबंधितांना वाढीव एफएसआय देऊन वाड्यांचे पुनर्वसन करण्याला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत. नदीकाठच्या भागात चिखल साचला आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. कोल्डमिक्सने रस्ता दुरुस्तीला प्राधान्य द्यावे. पाऊस थांबल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. त्याकडे लक्ष दिले जावे. पुरामुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून मदत व्हावी.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in