अब्दुल सत्तार पालकमंत्री, तिथे अधिकारी निधीच खर्च करेनात!

धुळे जिल्ह्यात २१० कोटींच्या निधीतून खर्च झाले अवघे १४ कोटी.
Minister Abdull Sattar
Minister Abdull SattarSarkarnama

धुळे : अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पालकमंत्री असलेल्या धुळे (Dhule) जिल्ह्याच्या निधी, कामांच्या तक्रारीची बातमी नाही असा दिवस जात नाही. मात्र जिल्हा नियोजन समितीने गेले वर्षभरात २१० कोटींची तरतूद असताना नऊ महिन्यांत अवघे १४ कोटी खर्च केले. त्यामुळे आज होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक पालकमंत्री सत्तार काय उपाय करतात याची उत्सुकता आहे.

Minister Abdull Sattar
राज ठाकरेंचा राज्यात दबदबा, मात्र `या`मुळे धुळ्यात इंजिन साईडींगला!

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंदा २१० कोटींचा निधी मिळाला. पैकी नऊ महिन्यापर्यंत फक्त १४ कोटींचा निधी खर्च झाला आहे. जिल्हा नियोजन समितीकडे उर्वरित १९६ कोटींचा निधी पडून आहे. शिवाय एकूण निधीपैकी ६३ कोटी कोरोनासंबंधी उपाययोजना व आरोग्य बळकटीकरणासाठी खर्च करायचा आहे. मात्र, नऊ महिन्यांत केवळ सव्वाकोटींचा निधी वर्ग झाला आहे. सरासरी १८ कोटींच्या निधी खर्चाला प्रशासकीय मान्यता दिल्याचा दावा आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अब्दुल सत्तार शुक्रवारी (ता. १४) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकराला नियोजन समितीची बैठक होईल. यात कार्यकारी समिती बैठक, जिल्हा नियोजन समिती बैठक, डोंगरी विकास कार्यक्रम समिती बैठकीचा समावेश असेल. नंतर जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीची दुपारी दोनला आढावा बैठक होईल. पुढे दुपारी अडीचला गुलमोहोर शासकीय विश्रामगृहात आगमनानंतर सोयीनुसार ते सिल्लोडकडे प्रयाण करतील.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com