आदित्य ठाकरेंना सुहास कांदे विचारणार `माझे काय चुकले?`

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज मनमाडमध्ये सुहास कांदे यांना आव्हान देणार.
Aditya Thakrey & Suhas Kande`s Banner
Aditya Thakrey & Suhas Kande`s BannerSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाची डागडूजी आणि शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांचा दौरा सुरु आहे. ते आज बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदारसंघात मनमाड येथे येणार आहेत. यावेळी कांदे यांनी त्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तणावाची स्थिती असून खरच कांदे ठाकरे यांना भेटणार का याची उत्सुकता आहे. (Will Really Rebel Suhas Kande meet Aditya Thakrey Today)

Aditya Thakrey & Suhas Kande`s Banner
उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला!

शिवसेना नेते आदित्य ठाकरे काल नाशिक शहरात दाखल झाले. त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत झाले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षामध्ये दिसलेला जल्लोष, श्री. ठाकरे यांच्यासाठी झालेली घोषणाबाजी यामुळे देखील बंडडखोरांत चिंतेचे वातावरण आहे. या स्थितीत दुपारी ते मनमाडला जाणार आहेत. थेट बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात धडक मारणार असल्याने शिवसेना कार्यकर्ते, नागरिकांत देखील उत्सुकता आहे.

Aditya Thakrey & Suhas Kande`s Banner
खासदार हेमंत गोडसे फुटले, मात्र शिवसैनिक जागचा हलला नाही.

या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी नवे राजकीय नाट्य घडविण्याची घोषणा केली आहे. श्री. कांदे यांनी `माझे काय चुकले?`अशी टॅग लाईन असलेले होर्डींग्ज तयार केले आहेत. मी दहा हजार कार्यकर्ते घेऊन आदित्य ठाकरे यांनी भेटणारव त्यांना विचारणा करणार असे जाहीर केले आहे.त्यामुळे खरोखरच ते भेटणार की हे एक नाट्य आहे, याचे स्पष्टीकरण काही तासांतचच होईल.

यावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मात्र अतिशय तीव्र शब्दांत कांदे यांचा समाचार घेतला आहे. भेटायचे होते तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर येण्याचे आवाहन केले तेव्हा का नाही भेटले?. असा प्रश्न शिवाजी भोर यांनी केला आहे. जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांनी कांदे हे पब्लिसीटी स्टंट करण्यात तरबेज आहे. यापूर्वीही त्यांनी असे प्रकार केले आहेत. ते सर्व त्यांच्या बंडखोरीने उघड झाले. त्यामुळे खरे तर आमदार कांदे नांदगावच्या जनतेत उघडे पडले आहेत. त्यांनी हे प्रकार थांबवावे असे सांगितले.

दरम्यान आमदार कांदे यांनी, `मुंबई बॅाम्बस्फोट घडवणाऱ्या याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख व त्या सर्वांशी संपर्कात असलेले नवाब मलिक यांच्याशी युती करण योग्य वाटते का?`, `आपल्या साहेबांना टी बाळू बोलणाऱ्या व साहेबांना जेलमध्ये टाकण्याची हिंमत करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे योग्य आहे का?`, आंबेडकर स्मारकासाठी निधीची मागणी केली, मात्र आपण निधी का दिला नाही, अहिल्यादेवी स्मारकासाठी ५० पत्र दिलीत. मात्र तुम्ही निधी का दिला नाही अशा आशयाचे विविध प्रश्न असलेले कॅम्पेन केले आहे. हे कॅम्पेन नियोजनपूर्वक आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला केले. त्यात प्रोटोकॅाल म्हणून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे आहेत. त्यामुळे हे सर्व चर्चेचा विषय आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in