आदित्य ठाकरे नाशिकच्या शिवसैनिकांना काय कानमंत्र देणार?

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्या नाशिकच्या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील.
Aditya Thakre
Aditya ThakreSarkarnama

नाशिक : चाळीस आमदारांसह स्वतंत्र गट निर्माण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेलाच (Shivsena) आव्हान दिल्यानंतर राज्यातील आपल्या गढ्या मजबूत आहे की नाही, याची चाचपणी करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thakrey) मैदानात उतरले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या नाशिकमध्ये (Nashik) श्री. ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा दाखल होत आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. (Yuvasena chief Aditya Thakrey visits nashik for party meetings)

Aditya Thakre
भाजपच्या चार महिला आमदारांना शर्विलकाचा गंडा!

राज्यात शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात नाशिकची भूमिका कायम महत्त्वाची राहिली आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर नाशिकमधून समता परिषदेची बांधणी केली. त्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेची दोन हात करताना जिल्ह्यातील दोन आमदार बरोबर घेतले होते. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्या वेळी नाशिकमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला.

Aditya Thakre
धुळे शहराला अमृत योजनेंतर्गत २५० कोटी द्यावे

त्यामुळे शिवसेनेसाठी नाशिक हा राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेच्या गढ्या मजबूत आहे की नाही, याची चाचणी करण्यासाठी मैदानात उतरले आहे.

शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेची सध्या अस्तित्वात असलेली ताकद ते आजमावून पाहत आहे. त्या अनुषंगाने आदित्य ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरत आहे. २१ जुलैला ते नाशिकमध्ये येणार असून, यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार दादा भुसे व सुहास कांदे यांच्या मतदारसंघातदेखील भेट देणार आहे. ‘आपला भगवा, आपली शिवसेना’, असा नारा आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेत दिला आहे

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी

गुरुवारी सायंकाळी सहा वाजता आदित्य ठाकरे नाशिकमध्ये येतील. याचवेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुसऱ्या दिवशी निफाड, मनमाड, नांदगाव, दाभाडी, दिंडोरी, येवला असा दौरा होईल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in