रितेश- जेनेलिया रमले नाशिकच्या बाळ येशूच्या दारी!

जगातील मोजक्या तीन मंदिरांत (चर्च) गणलेजाणारे येथील बाळ येशू चर्च अनेकांचे श्रद्धास्थान आहे.
Ritesh & Jeneliya Deshmukh with family
Ritesh & Jeneliya Deshmukh with familySarkarnama

नाशिक : जगातील मोजक्या तीन मंदिरांत (चर्च) (one of important Church) गणलेजाणारे येथील बाळ येशू चर्च (Infant jesus Church) अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया देसमुख- डिसुझा (Jeneliya desouza) यांनीही काल या मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिराच्या परिसरात ते रमले. त्यांचा खाजगी दौरा असल्याने त्याची कुठे चर्चा नव्हती. मात्र येऊन गेल्यावर मात्र तो अनेकांना कौतुकाचा विषय ठरला.

Ritesh & Jeneliya Deshmukh with family
नितीन गडकरींचे गिफ्ट; नाशिक-मुंबई महामार्गाचे कॉंक्रिटीकरण!

नाशिक- पुणे महामार्गावरील प्रसिद्ध बाळ येशू मंदिरामध्ये प्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख व पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा- देशमुख व रितेश यांचे सासरे नील डिसूझा, सासू जेनीती डिसूझा यांनी दर्शन घेतले व प्रार्थना केली. या वेळी फादर ऑगस्टीन उपस्थित होते. त्यांनी या वेळी चर्चमध्ये प्रार्थना केली. देशमुख परिवाराच्या सूनबाई जेनेलिया डिसूझा - देशमुख या दरवर्षी बाळ येशू मंदिराला भेट देऊन दर्शन घेतात. यंदाही रितेश देशमुख यांनी पत्नी, सासू, सासरे समवेत मंदिरात मनोभावे प्रार्थना केली.

बाळ येशू मंदिर देशात एकमेव असून, दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी या ठिकाणी मोठी यात्रा उत्सव भरला जातो. देश- विदेशातील ख्रिस्ती बांधवांसह भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यात्रोत्सव काळात या ठिकाणी सर्व भाषेतून प्रार्थना केल्या जातात. कोरोना नियम पाळून देशमुख- डिसूझा परिवाराने प्रार्थना करून अर्धा तास मंदिरात घालवला. मंदिर परिसरात काम करणारे कर्मचारी महिलांशी रितेश व जेनेलिया यांनी संवाद साधला. मागील काही दिवसापूर्वी करिना व करिष्मा कपूर यांनी बाळ येशू मंदिरात येऊन भेट दिली व प्रार्थना केली होती. दरवर्षी कपूर परिवारातील सदस्य या मंदिराला आवर्जून भेट देऊन प्रार्थना करतात.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com