Nashik ACB News: धक्कादायक : बाजार समितीत आहे तरी काय? एका मतासाठी मोजले ३० लाख!

DDR Satish Khare News: जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडील सुनावणीसाठी तीस लाखांच्या लाचेचे प्रकरण आहे तरी काय?
DDR Satish Khare
DDR Satish KhareSarkarnama

Nashik ACB News: जिल्हा सहकार उपनिबंधकांना सोमवारी ३० लाखांची लाच स्विकारताना एसीबीने कारवाई केली. या प्रकरणाच्या मुळाशी गेले तर धक्कादायक माहिती पुढे आली. दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा एक उमेदवार एका मताने पराभूत झाला होता. त्यातून हा प्रकार घडला. (Bribery is not new in cooperative sector at all)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जऊळके वणी येथील नेत्याच्या दिंडोरी बाजार समितीच्या (Nashik) पॅनेलचा उमेदवार एक मताने विजयी झाला. खेडगाव येथील नेत्याच्या पॅनेलचा उमेदवार पराभूत झाला. (Elections) त्याने सहकार उपनिबंधकाकडे अपील केले होते. त्यातून हा प्रकार घडला.

DDR Satish Khare
ACB Trap News : ३० लाख लाच घेणाऱ्या सहकार उपनिबंधकाच्या घरात सापडले घबाड?

सहकार विभागात लाच हे प्रकरण नवे नाही. जीथे त्या विभागाचे मंत्री नियुक्त्याच अर्थपुर्ण घडामोडींतून होतात, तीथे अधिकाऱ्यांनी अर्थपुर्ण व्यावहार केले तर त्यात काय विशेष?. गंमत म्हणजे सहकाराच्या राजकारणात रुळलेल्या नेत्यांना ते सोयीचे वाटते. ज्यांच्यावर कारवाई झाली ते जिल्हा उपनिबंधक हे तर राजकीय नेत्यांच्या गळ्यातील ताईत होते. सर्वच नेत्यांत ते अतीशय प्रिय होते. त्याचा लाभ प्रशासन सर्व नेत्यांनी मी तुमचाच असे भासवून त्यांच्याकडून नियमीत तीर्थप्रसाद घेत होते याची चर्चा या विभागाशी संबंधीत लोक करीत आहेत.

हे प्रकरण दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीचे आहे. येथील एक उमेदवार एक मताने विजयी झाला आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणी देखील केली होती. मात्र त्यानंतर राजकीय स्पर्धेतून पराभूत उमेदवाराने जिल्हा उपनिबंधकाकडे अपील केले होते. यात अपील करणाऱ्या पराभूत उमेदवाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी प्रारंभी त्याचे वकिल साबद्रा यांच्यामार्फत तीस लाखांची मागणी करण्यात आली. एका संचालकपदाचा निर्णय यातून बदलणार होता. म्हणजेच एका संचालकपदासाठी तीस लाख देणारा नेता होता. दिंडोरी सारख्या बाजार समितीत असे काय दडले आहे की, त्यासाठी एव्हढी मोठी रक्कम देण्यास नेते तयार झाले.

DDR Satish Khare
Akole Bazar Samiti: पिचड पितापुत्रांना धक्का; लहामटे-गायकरांनी पिचडांकडून अकोले बाजार समिती हिसकावली

लाच देणे व स्विकारणे याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नेहेमीच कारवाई करतो. सहकार विभागात अलिकडच्या काळात सिन्नर, निफाडच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. त्याआधी एका देशपांडे या अधिकाऱ्याबाबत थेट विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर आमदार आक्रमक झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. परंतू एकंदरच हे प्रकार व त्याच्या मुळाशी असलेल्या घडामोडी या सामान्यांसाठी धक्कादायक असतात, हे यातून पुन्हा एकदा समोर आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in