‘ॲन्टीकरप्शन’च्या चौकशीने जिल्हा बँक संचालकांची झोप उडाली!

महासंचालकांच्या आदेशामुळे राजकीय नेत्यांच्या अडचणी वाढणार.
‘ॲन्टीकरप्शन’च्या चौकशीने जिल्हा बँक संचालकांची झोप उडाली!
NDCC BankSarkarnama

नाशिक : जिल्हा बँकेतील (Nashik) आर्थिक घोटाळ्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) चौकशी केली जाणार आहे. या चौकशीमुळे विविध पक्षांचे आमदार, खासदार व नेते असलेल्या संचालक व अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. यातील अनेक संचालकांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने `एसीबी` पुढे देखील चौकशीचे आव्हान आहे. (Cooperative department given permission to ACB for inquiry)

NDCC Bank
राणा दाम्पत्याला उद्देशून बाळासाहेब थोरात म्हणाले...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरती व इतर विभागात आर्थिक घोटाळा झाला आहे, या संदर्भात आता नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी केली जाणार आहे. सहकार विभागाच्या परवानगीनंतर पोलिस महासंचालक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्यास पत्र देत आदेश दिले आहे.

NDCC Bank
शिवसेनेचा लढा सत्तेसाठी नव्हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी!

सहकार विभागाऐवजी थेट पोलिस विभागातर्फे चौकशी होणार असल्याचे बँकेच्या तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २०१७-१८ मध्ये ४१४ कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यात आली होती. यासह दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेत अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावेळी बँकेचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले होते. नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात नियम धाब्यावर बसवून उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती. सदरची भरती ही नियमबाह्य असल्याचेही तत्कालीन सहकारमंत्री यांनी सुभाष देशमुख यांनी सांगितले होते. या सर्व प्रकरणाची सहकार विभाग ऐवजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलिस महासंचालक यांच्याकडे चौकशीसंदर्भात पत्रव्यवहार केल्यानंतर पोलिस महासंचालक यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश विभागास दिले आहे. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in