कारवाई टाळण्यासाठी शिक्षकाकडे लाच मागणारा मुख्याध्यापक अडकला जाळ्यात

शिक्षकाकडे दहा हजार रुपये लाच मागणे पडले महागात
Bhanudas Mali & Hafiz Pathan
Bhanudas Mali & Hafiz PathanSarkarnama

धुळे : सोनगीर (ता. धुळे) (Songir) येथील एन. जी. बागूल हायस्कूलच्या मुख्याध्यापक (Head master) तथा प्राचार्याच्या सांगण्यावरून सहाय्यक शिक्षकाने (Teacher) शाळेतील शिक्षकाकडून लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने दोघांना पकडले. तक्रारदार शिक्षकाला कारणेदाखवा नोटिशीवर कारवाई न होण्यासाठी लाचखोर दोघांनी दहा हजारांची मागणी करीत तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारले. (Head master accept 5K bribe from teacher caught by ACB)

Bhanudas Mali & Hafiz Pathan
`ओडिशा`च्या प्रमाणे राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या!

या प्रकरणी संशयित दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिक्षण क्षेत्रात लाचखोरीच्या घटना वाढत आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

Bhanudas Mali & Hafiz Pathan
हायस्पीड रेल्वे असताना तिसरा महामार्ग हवा कशाला?

येथील एन. बी. बागूल हायस्कूलमध्ये तक्रारदार हा सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे. त्याला मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी याने कसूरीच्या कारणास्तव नोटीस दिली. त्याबाबत तक्रारदार हा मुख्याध्यापक माळी याला भेटण्यास गेला.

त्याने शाळेतीलच सहायक शिक्षक हाफीजखान पठाण यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने यांनी शिक्षक पठाण यांची भेट घेतली. पठाण याने तक्रारदाराला देण्यात आलेल्या कारणेदाखवा नोटिशीवर कारवाई न होण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे पीडित शिक्षकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. सहाय्यक शिक्षक पठाण याने तक्रारदाराकडे तडजोडीअंती पाच हजार लाचेची मागणी केली. याअनुषंगाने मंगळवारी तक्रारदारला पडताळणीकामी मुख्याध्यापक भानुदास माळी यांच्याकडे पाठविले असता त्याने कारणेदाखवा नोटिशीवर कारवाई न होण्यासाठी लाचेची रक्कम सहायक शिक्षक पठाण याला देण्यास सांगितले.

बुधवारी (ता. १९) एसीबीच्या पथकाने सापळा रचला. कारवाईत सहाय्यक शिक्षक हाफीजखान पठाण याने तक्रारदाराकडून मुख्याध्यापक माळी याच्या सांगण्यावरुन पाच हजार लाचेची रक्कम स्विकारली. हा प्रकार सोनगीर येथील पोलिस ठाण्यासमोर मुंबई- आग्रा महामार्गलगत घडला. संशयित माळी, पठाण याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे व वाचक पोलिस अधीक्षक सतीश भामरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे येथील उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, संदीप कदम, रोहिणी पवार, रामदास बारेला, गायत्री पाटील, वनश्री बोरसे, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com